हेल्थ केअर : आरोग्याचे ‘अर्थ’कारण

आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात फक्त डॉक्टर्स, फार्मासिस्ट, नर्सिंग आणि फारतर इंजिनियर किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच संधी असते, हा मोठा गैरसमज बारावी किंवा पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये असतो.
हेल्थ केअर : आरोग्याचे ‘अर्थ’कारण
Summary

आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात फक्त डॉक्टर्स, फार्मासिस्ट, नर्सिंग आणि फारतर इंजिनियर किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच संधी असते, हा मोठा गैरसमज बारावी किंवा पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये असतो.

आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात फक्त डॉक्टर्स, फार्मासिस्ट, नर्सिंग आणि फारतर इंजिनियर किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच संधी असते, हा मोठा गैरसमज बारावी किंवा पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये असतो. बारावीनंतरच्या करिअरसाठी मुले अशीच पारंपरिक क्षेत्रे निवडतात. कोविडनंतच्या जगात आरोग्य क्षेत्रात ज्या काही नवीन करिअरच्या संधी निर्माण होत आहेत, त्यामध्ये ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ (आरोग्याचे अर्थशास्त्र) ही शाखा अग्रेसर असेल.

सर्वसाधारण भाषेत सांगायचे झाले, तर ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ म्हणजे सर्वच प्रकारच्या आरोग्य आणि आरोग्यसेवा निर्णय घेण्यासाठी आवश्यक परिमाणवाचक, सैद्धांतिक आणि विश्लेषणात्मक क्षमतांचा अभ्यास करून सरकारी यंत्रणांना किंवा खासगी उद्योगांना सल्ला देणे. कोविडनंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आलेल्या आणीबाणीसदृश स्थितीमुळे सध्या अनेक विकसित देशांत हे ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ ही नवीनच शाखा अतिशय वेगाने विकसित होत आहे. याचबरोबर विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये आरोग्य अर्थशास्त्रातील तज्ज्ञांची मागणी वाढत आहे, त्यामुळे या क्षेत्रात तरुणांना करिअरचा नवीनच आदर्श मार्ग उपलब्ध होत आहे.

‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ नक्की कसे कार्य करते?

‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यप्रणाली आणि त्यांचे उपलब्ध असणारे स्तर यांचे आर्थिक विश्लेषण करते.

  • मानवी आरोग्यप्रणालींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थशास्त्रीय टप्पे कसे असतात, त्यांचे कार्य कसे चालते आणि प्रत्येक टप्प्यावर खर्च आणि या होणाऱ्या खर्चावर काय अवलंबून असते हे मोजण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ मदत करते. यासाठी अर्थशास्त्रातील विविध पद्धती वापरल्या जातात.

  • याही पुढच्या टप्प्यात ‘हेल्थकेअर डेटा’ म्हणजेच वेगवेगळ्या स्तरावरील आरोग्यविषयक माहिती एकतर करून त्याचे विश्‍लेषण करणे आणि त्यावरून आरोग्य क्षेत्रात उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल याचे अनुमान काढणे.

  • याचबरोबर अनेक प्रकारच्या उपचारांच्या किमती आणि त्या किंमतीवरून त्याची परिणामकारकता याचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे याचासुद्धा समावेश यामध्ये होतो.

  • रुग्णांसाठी किंवा डॉक्टरांसाठी अर्थशास्त्रीय पद्धती वापरून क्लिनिकल दृष्टिकोन ठरवणे, पुढे हाच दृष्टिकोन सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमध्ये आणणे, त्यामधील संशोधन करून सरकारी भागीदारी वाढवणे, हासुद्धा मुख्य हेतू ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ या शाखेचा आहे.

  • अनेक प्रकारच्या खासगी किंवा सरकारी आरोग्यविमा पुरवणाऱ्या कंपन्यांना जगभरातील अनेक देशांमधील माहिती पुरवून नवनवीन प्रकारच्या विमा पॉलिसी तयार करण्यासाठी मदत करणे हेसुद्धा काम ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ या शाखेचे आहे.

  • सरकारी किंवा खासगी भागीदारी करून हेल्थकेअर क्षेत्रात संशोधन करणे आणि त्यावरून रुग्ण त्यांच्या स्वत:च्या आरोग्याशी, त्यांच्या सेवा आणि चिकित्सकांशी कसे बांधील असतात आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा यावरती काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास या शाखेत केला जातो.

  • वैद्यकीय अधिकारी, संस्था आणि आरोग्यप्रणालींसाठी वित्तपुरवठा, आरोग्यसेवा वितरणासाठी प्रोत्साहन; तसेच रुग्ण आणि डॉक्टर यांच्या वर्तणुकीची आर्थिक वैशिष्ट्येदेखील यामध्ये अभ्यासली जातात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जगभरातील अनेक देशांत सध्या ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ या अभ्यासक्रमाचा उपयोग करून आरोग्य यंत्रणा कार्यप्रदर्शन आणि उत्पादकतेच्या चालकांचे विश्लेषण आणि समजून घेणे, क्लिनिकल उपचार आणि सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांची किंमत-प्रभावीता, लोकांची आर्थिक वर्तवणूक आणि त्यांचे आरोग्य यावर संशोधन आणि त्या संशोधनाचा वापर करून सरकारी धोरण ठरवण्यासाठी केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com