हेल्थ केअर : हेल्थ इकॉनॉमिक्सचे स्वरूप

मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स म्हणजेच आरोग्य क्षेत्रात अर्थशास्त्राचा कसा उपयोग होतो, याची ओळख करून घेतली.
Economics
EconomicsSakal
Summary

मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स म्हणजेच आरोग्य क्षेत्रात अर्थशास्त्राचा कसा उपयोग होतो, याची ओळख करून घेतली.

मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स म्हणजेच आरोग्य क्षेत्रात अर्थशास्त्राचा कसा उपयोग होतो, याची ओळख करून घेतली. नवीनच विकसित होणाऱ्या या क्षेत्रात कशा प्रकारच्या करियरच्या संधी उपलब्ध होतील आणि या क्षेत्राचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याची माहिती घेऊ या. ज्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र किंवा तत्सम शाखेतील पदवी तसेच पदव्युत्तर पदवी घेतली असेल आणि ज्यांना वेगळ्या करिअरच्या वाटा निवडायच्या असतील त्यांना या क्षेत्रात खूप संधी निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर काही विद्यार्थी, नोकरदार किंवा स्वतःचा व्यवसाय असणारे लोक त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ किंवा वैद्यकीय आणि संबंधित कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या लोकांना हेल्थ इकॉनॉमिक्सच्या कौशल्यांचा फायदा होऊ शकतो. या कौशल्यांचा आधारे जागतिक स्तरावर आरोग्य सेवेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

फक्त अर्थशास्त्रातील पदवीधर नाही तर हेल्थकेअर प्रोफेशनल लोकांना समकालीन आरोग्य सेवा आणि त्यामधील आव्हाने अर्थशास्त्राच्या दुर्बिणीतून समजून घ्यायची असतील तर हे क्षेत्र त्यांना जागतिक संधी मिळवून देऊ शकते. सरकारी क्षेत्रातील आरोग्य धोरण आणि त्याचे अर्थशास्त्रीय विश्‍लेषण, हेल्‍थ फंडिंग आणि त्यामधील कर्मचाऱ्यांची आवश्यकता याचे योग्य सुसूत्रीकरण करणे यासाठी या नवीन उदयास येत असलेल्या शाखेचा खूप उपयोग होत आहे.

या क्षेत्रातील कौशल्ये मिळविल्यावर आरोग्यविषयक आर्थिक धोरण याचे नवीनच क्षितिज दिसण्यास सुरवात होईल.

  • यामुळे मुख्य आर्थिक तत्त्वांची सखोल माहिती आणि ते आरोग्य सेवा क्षेत्राशी कसे संबंधित आहे याचे ज्ञान उपलब्ध होईल.

  • अर्थशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे जसे की पुरवठा तशी मागणी, या नियमावर आधारित आरोग्य क्षेत्रातील सेवांची कार्यक्षमता, समता आणि त्यांची मागणी याचे नवीन वर्तुळ तयार करता येईल.

  • कोरोनानंतर जगभरात ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’ ही नवीन संकल्पना जगातील अनेक देश राबविण्याची तयारी करत आहेत. यासाठी फार मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्र आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्राचा अनुभव किंवा ज्ञान असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लागणार आहे.

  • औषधनिर्माण क्षेत्रातील म्हणजेच फार्मास्युटिकल उत्पादनाच्या जीवन चक्रातील मुख्य टप्पे आणि या पायऱ्यांवर आधारित आर्थिक सिद्धान्त समजून घेण्यासाठी याचा फायदा होऊन या क्षेत्रातही नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

मोठमोठ्या हॉस्पिटल्सना किंवा खर्चिक अशा दीर्घ आजार असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना दररोजच्या जीवनात वेगवेगळ्या उपचारांच्या निवडीसह इतर अनेक कठीण निर्णय घ्यावे लागतात. खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार करताना अनेकदा नातेवाइकांना, हॉस्पिटल व्यवस्थापन आणि आरोग्य विमा सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांना आर्थिक निर्णय घेताना समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी रुग्णांचे आरोग्य, त्याचबरोबर सामाजिक काळजी प्रणाली कशा प्रकारे आयोजित केली जावी, त्यासाठी कशाप्रकारचे आर्थिक नियोजन आणि त्याचे परीक्षण केले जावे; आरोग्य आणि सामाजिक काळजी प्रणालीमध्ये रुग्ण आणि जनतेची भूमिका यासह अनेक पर्यायांचा विश्लेषणात्मक फ्रेमवर्क आणि पुरावे प्रदान करण्यासाठी अर्थशास्त्रीय आराखडा तयार करण्यासाठी या नवीन उदयास येत असलेल्या क्षेत्राची मोलाची मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com