न्यू नॉर्मल : सर्वसामान्यांसाठी आरोग्य सुविधा

आम्ही एका वैद्यकीय क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या एम.आर. (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह)चे प्रशिक्षण घेत होतो.
Health facility
Health facilityesakal
Summary

आम्ही एका वैद्यकीय क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या एम.आर. (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह)चे प्रशिक्षण घेत होतो.

आम्ही एका वैद्यकीय क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या एम.आर. (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह)चे प्रशिक्षण घेत होतो. वर्षभर चालणारा हा कार्यक्रम भारत सरकार, बदललेले आरोग्य वास्तव, सोयी व सरकारी योजना या भोवती गुंफलेला होता. याअंतर्गत मी त्यांना विचारत होते, आपल्यापैकी कितीजण किडनी, हृदय, डोळे यासारख्या रोगांसाठी तळागाळात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सपर्यंत जाता? उत्तर होते नाही! कारण त्या वर्गाला औषधे परवडणारी नाहीत. चांगली आरोग्य सेवा प्रत्येकाला मिळावी या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत’ ही योजना कार्यान्वित झाली आहे. परंतु या सरकारी योजनांची माहिती या एम. आर. यांना नव्हती. त्यांना असे काही सरकार करतेय हे ऐकूनही माहिती नव्हते. माझा प्रयत्न या प्रशिक्षणात हाच होता की सेवा देणारे दुवे जोडले पाहिजेत, जेणेकरून सेवा अधिक प्रभावी व उपयुक्त ठरेल. याद्वारे त्यांच्या लक्षात आले, की भारी व खर्चिक औषधेही तळागातील लोकांना प्रिस्क्राइब करू शकतात व ते घेण्याची कुवत त्यांना सरकारने दिली आहे. नेमका हाच संदर्भ दोन्ही बाजूंना दिला जाणे व त्यातून नवा पूल बांधणे हे आज गरजेचे आहे.

आरोग्य सेतूचे नवनिर्मितीकार

फार्मा कंपनी व सरकारी योजना या हातात हात घालून चालत आहेत किंवा चालल्या तर आपल्या योजनांचे सार्थक होईल. फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ही माहिती, रेडीरेकनर असल्यास त्यांचा जे डॉक्टर वाडीवस्तीत प्रॅक्टिस करतात त्यांच्यापर्यंत जाण्याचा, त्यांना नवी औषधे दाखविण्याचा वेग वाढेल, आरोग्य सुधारेल. हे चक्र सुरू राहण्यासाठी या आरोग्य सुविधांच्या साखळीमधील प्रत्येक जबाबदार व्यक्तीला ही माहिती उपयुक्त आहे. मग तो डॉक्टर असो किंवा जनरल फिजिशियन, सुपर स्पेशॅलिटी वा तो पॅथॉलॉजिस्ट असो किंवा एक्स-रे टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट असो अथवा मामा-मावशी यातील प्रत्येक घटनाकार हे ‘आरोग्य सेतू’चे नवनिर्मितीकार आहेत. भारत सरकारच्या योजना बाळ जन्माला येण्यापूर्वी, म्हणजे पहिल्या महिन्याच्या प्रेग्नंसीपासून किंबहुना ती योग्य व्हावी यासाठी सुरू होतात. माता आहार, पोषण व बाल विकास याची काळजी घेणाऱ्या योजना, मातृत्व वंदनासारखा कार्यक्रम, इंद्रधनुषसारखी योजना या साऱ्या एकमेकांना जोडणाऱ्या कड्या आहेत. ० ते १८ व १८ ते ८० या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी भारत सरकारने अनेक योजनांद्वारे आधार दिला आहे. उत्तम आरोग्य म्हणजे रोग बरा करणे नव्हे, तर रोग प्रतिबंधक असे वातावरण तयार करणे, त्यासाठी शरीर व मनाची काळजी घेणे. म्हणूनच आरोग्य सेवा व स्वच्छता अभियान हातात हात घालून आहेत.

मला आठवते, प्रकाश जावडेकर यांनी खासदार म्हणून दत्तक घेतलेले मध्य प्रदेशातील पालदेव हे गाव जेथे बहुतांशी मुलींचे अनारोग्य, ॲनिमिया व डायरिया या तक्रारी होत्या. सर्वेक्षण झाल्यानंतर दोन बाबी सर्वप्रथम करण्यात आल्या त्या अशा

१) सर्व हातपंपाच्या बाजूंना फरशी घालण्यात आली जेणेकरून चिखल डास किडे-मुंग्या यांचा प्रादुर्भाव कमी होईल.

२) आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या.

दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून सहा महिन्यांनी आरोग्याचे मानक सुधारताना दिसले. म्हणूनच विविध सरकारी योजनांची माहिती पुढील लेखात घेऊयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com