न्यू नॉर्मल : सर्वसामान्यांसाठी आरोग्य सुविधा

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध सरकारी योजना आहेत. त्याची माहिती घेऊन सजगपणे त्याचा वापर केला पाहिजे.
Health facilities
Health facilitiessakal
Summary

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध सरकारी योजना आहेत. त्याची माहिती घेऊन सजगपणे त्याचा वापर केला पाहिजे.

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध सरकारी योजना आहेत. त्याची माहिती घेऊन सजगपणे त्याचा वापर केला पाहिजे.

1) आयुष्मान भारत योजना (PMJAY)

ही जगातील सर्वांत मोठी सरकारी अनुदानित आरोग्य सेवा योजना आहे. या अंतर्गत देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना (सुमारे ५० कोटी नागरिक) आरोग्य सुरक्षा प्रदान केली जाते. योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपये विमा संरक्षण असेल. या योजनेत १,३५४ आरोग्य पॅकेजेसचा समावेश आहे. कॅशलेस आणि पेपरलेस क्लेम सुविधा या योजनेत आहे.

2) जननी-शिशू सुरक्षा योजना

जननी सुरक्षा व शिशू सुरक्षा या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरक्षित मातृत्वासाठीच्या योजना आहेत. गरीब गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन माता आणि नवजात मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे उद्दिष्ट आहे. गर्भवती महिलेला सिझेरियन विभागासह, सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये मोफत प्रसूती, निदान, औषधोपचार, आहार यासह आर्थिक साहाय्य देण्यात येते. एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकांस प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार योग्यवेळी मोफत उपलब्ध करून दिले जातात.

3) पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान

या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये गर्भवती महिलांना दर महिन्याच्या ९व्या दिवशी मोफत खात्रीशीर आणि दर्जेदार प्रसूतिपूर्व आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध आहे.

4) मिशन इंद्रधनुष्य

० ते २ वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे पूर्णतः लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने २५ डिसेंबर २०१४ पासून ‘मिशन इंद्रधनुष्य’या नावाने विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत डिप्थिरिया, पेर्ट्युसिस, टिटॅनस, बालपण क्षयरोग, पोलिओ, हिपॅटायटीस बी आणि गोवर या आजारांपासून बचावासाठी मुलांचे लसीकरण केले जाते.

5) राष्ट्रीय पोषण अभियान

याद्वारे स्टंटिंग (योग्य पद्धतीने विकसित न होणे), कुपोषण, अल्पपोषण, ॲनिमिया आणि कमी वजनाच्या मुलांना त्यांच्या विकासासाठी मदत केली जाते..

6) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे एकूण जीवनमान सुधारण्यासाठी आणि समाजातील सर्व मुलांना सर्वसमावेशक आरोग्यसुविधा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे.

7) राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम

किशोरवयीनांच्या आरोग्यविषयक गरजा सर्वसमावेशकपणे पूर्ण करण्यासाठी व आरोग्याबाबत जागृतीसाठी हा कार्यक्रम आखला आहे. आहार, लैंगिक व प्रजनन आरोग्याची काळजी, असंसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य सुधारणे, अन्याय, वागणूक हिंसाचार, मादक पदार्थाचा गैरवापरास प्रतिबंधित करणे आदी कार्यक्रमाची उद्दिष्टे आहेत.

8) प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना

सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व नागरिकांचा औषधांवरील खर्च कमी व्हावा, या हेतूने ही योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत ‘जन औषधी’ केंद्रांवर अन्य केमिस्ट दुकानांच्या तुलनेत ५० ते ९० टक्के स्वस्त दराने औषधे उपलब्ध केली जातात.

9) ‘ई-रक्तकोश’ केंद्रीकृत रक्तपेढी व्यवस्थापन

ई-रक्तकोश पोर्टल ही एक केंद्रीकृत रक्तपेढी व्यवस्थापन प्रणाली आहे. याद्वारे वापरकर्ते सहजपणे रक्तपेढ्या शोधू शकतात, रक्ताची उपलब्धता तपासू शकतात आणि विविध शिबिरांमध्ये स्वयंसेवा करू शकतात.

10) ‘ई-संजीवनी’ राष्ट्रीय टेलिमेडिसीन सेवा

सरकारकडून नागरिकांना दिली जाणारी ही पहिलीच ऑनलाइन ओपीडी सेवा आहे. रुग्णांना त्यांच्या घरी आरोग्य सेवा देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि घरातील रुग्ण यांच्यात सुरक्षित आणि संरचित व्हिडिओ आधारित क्लिनिकल आणि वैद्यकीय सल्लामसलत सेवा ‘ई-संजीवनीद्वारे’ देण्यात येते.

या विविध योजनांचा एकत्रित परिणाम पुढीलप्रकारे दिसून येतो -

  • आयुर्मान ६५ वर्षांपर्यंत वाढले.

  • बालमृत्यू दर, माता मृत्यू दर आणि मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

  • पोलिओ, कांजिण्या, गुनिया वर्म आणि कुष्ठरोग यांसारखे आजार जवळपास संपुष्टात आले आहेत.

  • देशाच्या अनेक दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डॉक्टर, दवाखाने आणि नर्सेसची संख्या वाढली.

आरोग्य क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचे श्रेय, आरोग्य सेवांचा वाढता प्रवेश, सुधारित लसीकरण, वाढती साक्षरता आणि आरोग्य क्षेत्रातील सरकारच्या असंख्य उपक्रमांना जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com