न्यू नॉर्मल : ‘बंदर विकास’ गाथा

‘पर्ल’ या कृष्णापट्टणम पोर्टवरच्या कॉफी टेबल बुकसाठी त्या बंदराच्या किनाऱ्याला फोटो शूटिंग करण्यासाठी आमची सारी टीम उपस्थित होती.
Port Development
Port DevelopmentSakal
Summary

‘पर्ल’ या कृष्णापट्टणम पोर्टवरच्या कॉफी टेबल बुकसाठी त्या बंदराच्या किनाऱ्याला फोटो शूटिंग करण्यासाठी आमची सारी टीम उपस्थित होती.

‘पर्ल’ या कृष्णापट्टणम पोर्टवरच्या कॉफी टेबल बुकसाठी त्या बंदराच्या किनाऱ्याला फोटो शूटिंग करण्यासाठी आमची सारी टीम उपस्थित होती. कृष्णपट्टणम बंदर प्रतिवर्षी साडेसात कोटी टन कार्गो हाताळण्यास सक्षम आहे. हे भारतातील सर्वांत खोल बंदर आहे. भारतातील ७५१६.६ किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टीवरची बंदरे व त्याचा अभ्यास केला गेला. भारतात १३ प्रमुख व २०५ लहान बंदरे आहेत. प्रमुख बंदर म्हणजे, ज्याचे नियंत्रण भारत सरकारच्या अधिपत्यात आहे व लहान बंदरे बंदर म्हणजे, स्टेट मरिन बोर्ड/राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी व खासगी प्रवर्तक असणारी ही असू शकतात.

या दोनशे बंदरातील ६५ ठिकाणाहून सध्या मालवाहतूक होते. अन्य बंदरे प्रवासी वाहतूक, मच्छीमारी यासाठी कार्यरत आहेत. भारतातल्या बंदरांच्या विकासाच्या सर्वांगीण विचार प्रथम ‘मॅरिटाइम इंडिया व्हिजन-२०३०’ मध्ये मांडला गेला. १५० प्रकारचे विविध उपक्रम यात मांडले गेले. पंतप्रधानांनी २१ मार्च २०२१ला या धोरणाची घोषणा केली.

त्या आधीच सागरमाला व भारतमाला या दोन महत्त्वाकांक्षी योजना साकार झाल्या होत्या. भारताच्या २०१५मध्ये लॉजिस्टिक सर्वंकष धोरण आखताना या योजना मांडल्या गेल्या. सागरमालाचे उद्देश भारतीय दळणवळणातील जलमार्ग बुलंद करणे हा आहे. वेळ, श्रम, पैसा याची बचत, सुरक्षितता व पर्यावरणपूरकता असे फायदे या जलवाहतुकीचे आहेत. या प्रकल्पात ८०२ विविध प्रोजेक्टचा समावेश आहे.

भारतात आज प्रमुख मेजर पोर्ट मुंबई, कांडला, नवीन मंगरूळ, जेएनपीटी, मार्मागोवा, कोचीन, चेन्नई, एन्नोर, तुतिकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकता, पोर्टब्लेअर अशी आहेत. याचा कायापालट होण्यासाठी विकासाची, बंदरांची सर्व प्रकारे जोडला असणे. यात बंदराजवळचे रस्ते, रेल्वे, मल्टी मोडेल पाइपलाइन अशा अनेक बाबींचा समावेश आहे. चेन्नई बंदराची पाहणी करताना असे लक्षात आले, तेथे चार दिवस लागतील इतकी लांब रांग ट्रकची होती. आता यात दोन अडचणी होत्या- एक कस्टम क्लिअरन्सचे ऑफिस नऊ ते पाच काम करत. आम्ही तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांना याची माहिती दिली. त्यांनी गंभीर दखल घेतली आणि कस्टम ऑफिस २४ बाय ७ सुरू राहण्याची सुरुवात झाली.

हे बदल घडल्यानंतरही चेन्नईच्या अपुऱ्या अरुंद रस्त्याने ट्रॅफिक जाम होतच आहे. बंदराजवळ प्रशस्त जागा, सुविधा, रस्ते, रेल्वे या सगळ्यांनी ते अधिक सुसज्ज घडते. बंदराची तांत्रिक सुधारणा त्यांच्या आधुनिकीकरणाशी जोडले आहे. आता नव्या बंदरामध्ये जहाज दुरुस्ती, नव संगणकीकरण अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

सिंगापूर बंदरात महाकाय जहाजांमधील माल पूर्णपणे स्कॅन करणारी प्रशस्त स्कॅनर, बंदरातून जहाज आत येतानाच बसवले आहेत. माल न काढता, फिजिकल तपासणी न करता काय आहे, किती आहे, याची नोंद अचूकपणे होते. मालांचे कंटेनर कोणत्या क्रमाने रिकामी करायचे, किती वेळात तो उचलायचा, कुठल्या ‘बे’ वर ठेवायचा, याची सुसंगती आधीच ठरलेली असते.

आपल्या सर्व प्रमुख बंदरामध्ये जहाज येण्यापूर्वी सॅटेलाइट दळणवळणांनी जहाजामध्ये काय दुरुस्ती आहे, काय मदत हवी आहे, याचा तपशील पाठवतात. नवीन बदलांची रंजक कहाणी पाहू या पुढच्या लेखात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com