न्यू नॉर्मल : वेअरहाउसमधील कार्यपद्धती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Warehouse

पुस्तकांसाठी १९९४मध्ये एक ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणून सुरू झालेल्या अमेझॉनने दोन दशकांत ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स या दोन्हीत निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं.

न्यू नॉर्मल : वेअरहाउसमधील कार्यपद्धती

पुस्तकांसाठी १९९४मध्ये एक ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणून सुरू झालेल्या अमेझॉनने दोन दशकांत ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स या दोन्हीत निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं. ॲमेझॉन १८५पेक्षा जास्त देशांमध्ये ४० कोटीहून अधिक उत्पादने विकते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानाची, सुपर स्मार्ट रोबोची सेना, ३५० अब्ज डॉलरचा व्यवसाय असलेल्या ॲमेझॉनची त्रिसूत्री आहे. ॲमेझॉन किंवा अमेझॉन रोबोटिक्स प्रणाली वापरते. वस्तू साठवली जाते तेव्हा ती आकारमानानुसार ठेवली जाते. बारकोड वस्तू काय आहे हे सांगते. यात ड्रोन, स्वयंचलित व्हॅन, जीपीएस असलेले ट्रक्स हे सगळंही जोडलेलं आहे. त्यामुळे वस्तू ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत ॲमेझॉन तिच्या प्रवासाचा मागोवा घेते. अमेझॉन-ASIN १० वर्णांची अल्फान्युमेरिक मानक ओळख क्रमांक पद्धत वापरते. गोदामांची जुनी कल्पना आता हद्दपार झाली आहे. आता गोदामात प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था, मालाची ने आण करायला आधुनिक यंत्र सामग्री असते.

जड वाहनांना शहरात प्रवेश नसल्यामुळे लॉजिस्टिक्स पार्क अंतर्गत ही गोदाम पुण्याजवळ वाघोली, चाकण, मुळशी इथे विकसित होत आहेत. याचा अभ्यास करताना आम्ही ईस्क्वेअर वेअर हाऊसचे मालक व संचालक मोहन नायर यांना भेटलो. ते म्हणाले, ‘‘आम्ही काम सुरू केले तेव्हा या क्षेत्राला लॉजिस्टिक असं नामकरण नव्हतं. आमचं काम दळणवळण विभागात मोडत असे. वेअर हाऊस म्हणजे स्टोअरेज, त्याचा उपयोग केवळ माल भरण्यापुरता सीमित होता. जागतिकीकरणामुळे त्याच नामकरण ‘मटेरिअल मॅनेजमेंट’ असं झालं. मग स्पर्धा वाढली आणि त्याची जागा सप्लाय चेन मॅनेजमेंटने घेतली. वस्तू मिळण्याचा वेग आणि किंमत महत्त्वाची ठरली आणि ही प्रक्रिया लॉजिस्टिक म्हणून प्रस्थापित होऊ लागली.’

त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं वेग आणि किंमत या बरोबर माहिती तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा ठरत आहे. आता डेटा अॅनालिसिस महत्त्वाचे ठरते आहे. नायर यांच्या गोदामात ‘किंबरली क्लार्क’ चे सर्व प्रॉडक्ट्सचे पॅकिंग, री-पॅकिंग व डिस्पॅच (माल पाठवणे) होते. त्यांच्या कंपनीत असणारा मानवी संबंधाचा ओलावा, कुटुंब म्हणून कामगारांची काळजी त्यांचा विकास, त्यांच्या कल्पनांना दिलेली दाद, हे सगळे वेगळे होते. याचे श्रेय नेतृत्वाला त्यांच्या दातृत्वाला जाते. मात्र आजही लघु आणि मध्यम उद्योगामध्ये ही संवेदना रुजलेली दिसत नाही. या लोकांना कामातले बारकावे कळतात, त्यांच्यातीलच लोक व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम सूचना देतात, छोटे छोटे बदल सुचवतात. लॉजिस्टिक्स आणि गोदाम क्षेत्रातील कौशल्य विकासाचे महत्त्व पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आले.

Web Title: Dr Prachi Javadekar Writes Procedures In Warehouse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobWarehouse