न्यू नॉर्मल : पर्यटन क्षेत्र खुणावतेय

हिथ्रो या जगप्रसिद्ध विमानतळावर उतरल्यावर मुंबई, दिल्ली येथील विमानतळ किती सुसज्ज व अद्ययावत आहेत, हे प्रकर्षाने जाणवले. भारताने प्रवाशांना सुखद धक्के देण्याची मालिका ठेवली आहे.
Tourism
TourismSakal
Summary

हिथ्रो या जगप्रसिद्ध विमानतळावर उतरल्यावर मुंबई, दिल्ली येथील विमानतळ किती सुसज्ज व अद्ययावत आहेत, हे प्रकर्षाने जाणवले. भारताने प्रवाशांना सुखद धक्के देण्याची मालिका ठेवली आहे.

हिथ्रो या जगप्रसिद्ध विमानतळावर उतरल्यावर मुंबई, दिल्ली येथील विमानतळ किती सुसज्ज व अद्ययावत आहेत, हे प्रकर्षाने जाणवले. भारताने प्रवाशांना सुखद धक्के देण्याची मालिका ठेवली आहे. प्रवासाबरोबर पर्यटनाचा दर्जा व दृष्टिकोनही आपण बदलला आहे. आपल्या देशाला असणारा स्वच्छ सूर्यप्रकाश, दिवस रात्रीची समविभागणी, निश्चित ऋतुचक्रामध्ये टोकाचे तापमान नसणे, एकाच खंडात वाळवंट, समुद्रकिनारा, दरी-खोरे, जंगल, पर्वत, बर्फाळ प्रदेश किती विविध प्रकार आहेत. जितके प्रदेश तितके रंग, तितक्या भाषा, तितक्या विविध पाककृती, कलाकृती, नृत्य-गायन विविध प्रादेशिक संस्कृती. हा खजिना जगासाठी आपण उघडून देणार आहोत. भारताची नव्याने ओळख, नवी ताकद जगासमोर आणण्याची नीती आपण आखत आहोत.

मोठ्या किनारपट्टीवर आकर्षक समुद्रकिनारे

नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पोर्टलवर एकूण ४८७७५ निवास युनिट्स नोंदणीकृत आहेत आणि ११२२० युनिट्स SAATHI मानकांसाठी स्वयं-प्रमाणित आहेत. गेल्या दहा वर्षाच्या आकड्यांमध्ये पडलेला फरक लक्षणीय आहे. २०२२-२३ मध्ये आपले पर्यटन बजेट २,४०० कोटी रुपये असून ते २०२१-२२पेक्षा १८.४२ टक्के जास्त आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ५,३९९.१५ कोटी रुपयांच्या ७६ प्रकल्पांना मंजुरी दिली. अलीकडेच पर्यटन मंत्रालयाने ईशान्य भारतात १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या १६ पर्यटन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

भारतात २०२१मध्ये ७० लाख परदेशी पर्यटक आले. ती संख्या २०२० मध्ये ६३ लाख होती. भारत आता जगात सर्वांत जास्त भेट दिला जाणाऱ्या देशांच्या क्रमांकात २२वा आहे तर आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात आठव्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत पर्यटनात लक्षणीय वाढत आहे. ‘ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट’इंडेक्सनुसार आपण ५४ व्या स्थानावर आहोत. देशात पर्यटन पूरक सुविधांसाठी १४० विमानतळे तयार केले आहेत. २०२५ पर्यंत ती संख्या २२० होईल. यासाठी मंत्रालयाने ७००० कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.

कोरोनानंतर सरकारने ११,००० हून अधिक नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शक (टुरिस्ट गाइड), प्रवास आणि पर्यटन भागधारकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारताने पर्यटन व विकास, पर्यटन व व्यापार, पर्यटन व रोजगार याचा सहसंबंध लक्षात घेऊनच या विभागाला विशेष महत्त्व दिले आहे. आपली संस्कृती व नैसर्गिक संसाधनाचे जतन याचाही वारसा जपण्याचे ठरवले आहे. यामागे दोन घोषणांचा पाठिंबा आहे.

1) आत्मनिर्भर भारत

देशातील ग्रामीण पर्यटनाची अफाट क्षमता ओळखून, पर्यटन मंत्रालयाने भारतातील ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी राष्ट्रीय धोरण आणि रोडमॅप तयार केला आहे.

2) आझादी का अमृत महोत्सव

भारतीय विद्यापीठांच्या संघटनांसह पर्यटन मंत्रालयाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत १२ भागांची वेबिनार मालिका सुरू केली आणि आपल्या देशातील तरुणांना देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून दिली.

  • भारतातील जागतिक वारसा स्थळे - ४०

  • जैव-भौगोलिक क्षेत्र - १०

  • राष्ट्रीय उद्यान - १०६

  • अभयारण्य - ५६५

या संदर्भातील बदललेल्या धोरणांविषयी पुढील लेखात माहिती घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com