न्यू नॉर्मल : दळणवळण आणि रस्तेविकास

रस्ता शब्द उच्चारला की किती चित्रं डोळ्यांसमोर येतात भर दुपारच्या उन्हात तापलेला काळा कुळकुळीत चकाकणारा रस्ता.
Transportation and road development
Transportation and road developmentsakal
Summary

रस्ता शब्द उच्चारला की किती चित्रं डोळ्यांसमोर येतात भर दुपारच्या उन्हात तापलेला काळा कुळकुळीत चकाकणारा रस्ता.

रस्ता शब्द उच्चारला की किती चित्रं डोळ्यांसमोर येतात भर दुपारच्या उन्हात तापलेला काळा कुळकुळीत चकाकणारा रस्ता, पावसाच्या पाण्याने स्वच्छ न्हाऊन निघालेला, हिरव्या पानांची झालर असलेला रस्ता, सावली देणारा, गप्पा मारणारा, हिवाळ्यात धुक्याची साथ देणारा, मध्येच दिसणारा, लपणारा रस्ता. हे सारं झालं जरा काव्यात्मक. परंतु रस्ता जोडतो दोन गावांना, तालुक्यांना, शहरांना आणि प्रदेशांना. रस्ता दळणवळणाचा गाभा, आधारस्तंभ असून विकासाचा साक्षीदार आहे.

काश्मीरमध्ये पंतप्रधानांनी (बनिहाल-काझीगुंड बोगदा) हा रस्ता बांधण्याची घोषणा केली व त्याला ३१०० कोटी रुपयांचे साहाय्य दिले. केंद्रीय नितीन गडकरी औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात ‘औरंगाबाद-पुणे हे अंतर दीड तासात कापले जाणार’ अशी घोषणा केली आहे. त्यासाठी १० हजार कोटींचा संकल्प!

या दोन्ही बातम्या भारताच्या विकासाची आणि रस्तेबांधणीची भविष्यातील दिशा सांगत आहे. भारतात ६३, ७१, ८४७ किमी एवढ्या रस्त्यांची जोडणी आहे. जगात आपण अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहोत. दर हजार माणसांमागे आपल्याकडे ५.१३ किलोमीटर रस्ता उपलब्ध आहेत. अमेरिकेमध्ये तो २०.५ कि.मी. आहे, तर चीनमध्ये ३.६ किलोमीटर आहे. यासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा निकष आहे. भारतात ७१ टक्के मालवाहतूक व ८५ टक्के प्रवासी वाहतूक रस्त्यांमार्फत होते.

भारतमाला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण १, ३८, ५३१ किलोमीटर राष्ट्रीय व द्रृतगती मार्ग, १,७६,८१८ किलोमीटर राज्य रस्ते या प्रकल्पांतर्गत येतात. रस्त्यांची बांधणी राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण, शहरी, प्रकल्प मार्ग अशा प्रकारात मोडतात. भारतात पहिल्यांदा शहर आखणी व मार्गक्रमिका या इसवीसन पूर्व २८००मध्ये हडप्पा व मोहंजोदारोत असल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर अनेक सम्राटांनी राज्य विस्तारासाठी रस्ता व बंदर बांधणीचा केलेला वापर इतिहासात दिसतो. त्या गतवैभवात भारत सर्वाधिक निर्यात करणारा देश होता.

रस्ते उभारणी व दळणवळण याकडे स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याकडे विशेष लक्ष दिले. तथापि अपुरा निधी, दृष्टिकोन व राजकीय समीकरणे, सरकारी नियम व त्याचे अडथळे या शर्यतीत आपले रस्ते गतिमान होऊ शकले नाहीत.

अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या काळात जोडलेला ‘स्वर्णिम चतुर्भुज’ याकडे पथदर्शक प्रकल्प म्हणून पाहिले जाते. देशात २०११मध्ये सुमारे १६,००० किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण झाले. दर दिवशी अंदाजे ६ किलोमीटर रस्ता बांधला जायचा. हा वेग २०२२मध्ये सहापट झाला. देशात २०१४ पासून साधारण ३०,००० किलोमीटर रस्ते पूर्ण झाले आणि ते ३७ किलोमीटर दर दिवशी या गतीने आता बांधले जात आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार भारतात आता अंदाजे ५ कोटी ९ लाख किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे, जे २००८ मध्ये फक्त ४ कोटी किमी होते. १० वर्षांत ते सुमारे ३४ टक्के किंवा सुमारे १ कोटी ४ लाख किमी वाढले आहे.

भारतीयांनी २०१८मध्ये सरासरी दररोज ५४ हजार वाहने खरेदी केली होती. एका दशकापूर्वी ही संख्या दररोज १८ हजार होती. २००८मध्ये ६ कोटी सात लाख ३३ हजार ७८० पेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झाली होती. एका दशकानंतर २०१८मध्ये जवळपास तिप्पट वाहनांची नोंदणी झाली आहे. म्हणूनच उत्तम रस्त्यांची मागणी सातत्याने वाढते आहे.

भारतमाला परियोजना देशाच्या वाहतूक दळणवळण यासाठी २८ शहरांना जोडणारी रिंगरोड योजना १२५ पॉईंट्स ६६ कंजेक्शनचे अडथळे या लक्ष दिले आहे.

गती वाढवताना हा दृष्टिकोन हवा आहे तसेच ३५ ठिकाणी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क तयार केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com