
बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत गोदामांचे बाह्यरूप आणि व्यवसायातील स्थान बदलत आहे. लॉजिस्टिक्स खर्चावर पडणाऱ्या प्रभावामुळे देशाची जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची ताकद या गोदाम क्षेत्रावर अवलंबून आहे.
बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत गोदामांचे बाह्यरूप आणि व्यवसायातील स्थान बदलत आहे. लॉजिस्टिक्स खर्चावर पडणाऱ्या प्रभावामुळे देशाची जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची ताकद या गोदाम क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळेच भारतात अत्याधिक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि वेअरहाउस विकास यावर भर आहे.
नव्या लॉजिस्टिक्स धोरणानुसार देशात जास्तीत जास्त वेअर हाउस निर्माण करणे, व्यवसाय करण्यास सुलभ व्हावे यासाठी सिंगल-विंडो सिस्टम आणणे, ई-मार्केट प्लेस सक्षम करणे, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक तंत्रज्ञान व्यवसायात आणणे याला प्राधान्य दिले आहे.
विविध उत्पादन क्षेत्राच्या विशेष गरजा ओळखून त्याप्रमाणे गोदामांची निर्मिती करणे हे सरकारच्या उद्दिष्टांमध्ये आहे. लॉजिस्टिक्स सुकर होण्यासाठी सर्व सरकारी खात्यांमधला समन्वय वाढवणे आणि सुनियोजित गोदामांची बांधणी करणे गरजेचे आहे. लॉजिस्टिक क्षेत्राने २०१६मध्ये सुमारे २ कोटी १२ लाख लोकांना रोजगार दिला आणि २०२४ पर्यंत ही संख्या ३ कोटी २० लाखांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. मेक इन इंडिया, स्टँड अप इंडिया, इंडिया स्टार्ट-अप या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे एकूण लॉजिस्टिक्स क्षेत्र झपाट्याने बदलते आहे. मागणी व पुरवठा हा समतोल राखण्यासाठी काही विशेष लॉजिस्टिक्स कॉरिडॉर तयार करण्यात येत आहेत. यातील सप्लाय चेन कच्चा माल मिळविण्यापासून सुरू होते. मधल्या माल हस्तांतरणाच्या, इतर प्रक्रियांच्या छोट्या साखळ्या यात समाविष्ट असतात. याच शेवटचं टोक म्हणजे ग्राहकाला तयार उत्पादनाचे अंतिम वितरण. यामध्ये मूळ व्यवसायानुसार विक्रीनंतरच्या सेवांचा समावेश असू शकतो. ब्लू डार्ट कंपनीच्या प्रमुख तुलसी मीरचंदानी यांनी सांगितले की, भारताला लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी करण्यासाठी उत्तम तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. लॉजिस्टिक्स हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे असंच मानलं जातं परंतु ब्लू डार्टने १९८३पासून स्वत-चा ठसा उमटवत आज २२० देशामध्ये सेवा विस्तार केला आहे.
अदानी लॉजिस्टिक्स देशातील सर्वांत वैविध्यपूर्ण एंड टू एंड लॉजिस्टिक सेवा देणारा व्यवसाय आहे. त्यांनी या क्षेत्रात नवीन व्यवसाय पद्धती आणि तांत्रिक बदल आणले. रिटेल, इंडस्ट्रिअल, कंटेनर, बल्क, लिक्विड्स, यासारखे उत्पादन हाताळण्याचे कौशल्य हे त्यांचे वैशिष्ट्य. अदानी ॲग्री लॉजिस्टिक्सने कृषी क्षेत्र केंद्रस्थानी ठेवून त्याला पूरक अशी वाहतूक व्यवस्था प्रथम सुरू केली. अदानी लॉजिस्टिक्सचे ९ राज्यांमध्ये २१ स्टोअरेज सुविधा, १२७५ मिलियन मेट्रिक टन धान्य साठवण क्षमता, धान्य खरेदी आणि वितरण करण्याचे भारतभर पसरलेले जाळे, मल्टी मोडेल हब, विमानतळ आणि बंदर, वीज निर्मिती यासह एंड टू एंड लॉजिस्टिक्ससाठी सक्षम आहे. ज्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात परकीय कंपन्यांचा दरारा होता तिथे अदानी सारख्या भारतीय व्यवसायाने मोठं होणं आणि स्वत-च जाळे तयार करणे अभिमानास्पद बाब आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणारी ॲमेझॉन आणि इतर विकास कथा पाहू या पुढच्या लेखात.