करिअर जोपासताना : आवड जोपासायचीय? लिबरल आर्ट्स उत्तम!

लिबरल आर्ट्स या विषयात तुम्हाला आवडीच्या विषयात शिक्षण घेणे शक्य होत असून पारंपरिक शिक्षणापेक्षा हा वेगळा अनुभव ठरणार आहे.
Career
CareerSakal
Summary

लिबरल आर्ट्स या विषयात तुम्हाला आवडीच्या विषयात शिक्षण घेणे शक्य होत असून पारंपरिक शिक्षणापेक्षा हा वेगळा अनुभव ठरणार आहे.

- डॉ. प्रीती जोशी

मे महिना संपत आला की, दहावी-बारावीच्या निकालांचेही वेध लागतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्सनंतर आता मेडिकलला जायचं की इंजिनिअरिंगला, फायनान्समध्ये करिअर करायचं की ऑफबीट कोर्स निवडायचा अशा अनेक प्रश्नांनी आतापर्यंत तुम्हाला भंडावून सोडल असेल. परंतु, या सर्व पर्यायांना दूर ठेवून आपल्या आवडीच्या विषयात करिअर करायची इच्छा असल्यास त्यासाठी वेगळा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. मागील काही वर्षात पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून ऑफबीट किंवा नवीन विषयात अभ्यास करण्याचा ट्रेंड दिसून येत असून नवनवीन पर्यायांचा शोध घेतला जातो आहे. यातलाच एक उत्तम पर्याय म्हणजे लिबरल आर्ट्स.

लिबरल आर्ट्स या विषयात तुम्हाला आवडीच्या विषयात शिक्षण घेणे शक्य होत असून पारंपरिक शिक्षणापेक्षा हा वेगळा अनुभव ठरणार आहे. लिबरल आर्ट्सचे शिक्षण घेणे म्हणजे अनेक गोष्टी एकत्र शिकणे असा त्याचा अर्थ नसून पुस्तकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या अनेक बाबींचे शिक्षण घेण्यासाठी मनाला प्रशिक्षित करणे, असे उद्गार नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काढले होते. हाच अनुभव ही पदवी घेताना तुम्हाला येईल.

गेल्या काही वर्षांमध्ये लिबरल आर्ट्स या शाखेने शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे व उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. सोशल सायन्सेस (सामाजिक शास्त्रे), आर्ट्स (कला) आणि ह्युमॅनिटीज (मानवी समाज व सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र) यांचा लिबरल आर्ट्सच्या या शाखेत समावेश होतो. यामधील तुम्हाला आवड असलेल्या निवडक विषयांचा समावेश तुम्ही तुमच्या लिबरल आर्ट्सच्या अभ्यासक्रमामध्ये करू शकता.

उदाहरणार्थ, तुम्हाला राज्यशास्त्र या विषयात रस असेल तर राज्यशास्त्राबरोबरच संगणक व स्टॅटिक्स या विषयांची निवड करीत तुम्ही निवडणूक व मतमोजणी विश्लेषक म्हणून अधिक प्रभावीपणे काम करू शकता. तुम्हाला साहित्य या विषयात रस असेल तर साहित्य या विषयाबरोबर तुम्ही त्याला मॅनेजरिअल स्टडीची जोड देऊन पब्लिशिंग (प्रकाशन) व्यवसायात स्वत:चा वेगळा ठसा उमटवू शकता.

याशिवाय लिबरल आर्ट्स या पदवीमध्ये पारंपरिक विषयांबरोबरच समकालीन विषयांच्या जोडीने तुम्ही अधिकाधिक नव्या गोष्टी शिकू शकता. या विषयामध्ये मानसशास्त्र, माध्यमे, मास मीडिया, पत्रकारिता, फाईन आर्ट्स, वैदिक विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट्स या विषयांचा समावेश होतो. एकूणच काय तर लिबरल आर्ट्सच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शास्त्रांच्या मर्यादेमधून बाहेर पडत तुम्ही प्रभावी व मुक्तपणे तुम्हाला आवडणाऱ्या विषयांचे शिक्षण घेऊ शकता.

याबरोबरच लिबरल आर्ट्स खेरीज बी. ए. ऑनर्स या पर्यायाचा देखील तुम्ही विचार करू शकता. यामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी अशा ठराविक विषयांमध्येच आवड आहे आणि करिअर करायचे असल्यास सुरुवातीपासून तुम्हाला त्याच विषयाचा अभ्यास करण्याची संधी बी. ए. ऑनर्स या पदवीमध्ये मिळू शकते. या उलट ज्यांना एकापेक्षा जास्त विषयांमध्ये रस आहे व या सर्व विषयांचे एकत्रित ज्ञान घेऊन करिअर करण्याची इच्छा जे बाळगून असतील अशांसाठी लिबरल आर्ट्स हा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त पर्याय आहे.

एकूणच काय तर स्वत:च्या इच्छेने वेगवेगळे विषय निवडण्याच्या संधी लिबरल आर्ट्स या विषयातील पदवी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे स्वत:च्या प्रतिभेला आकार देण्याबरोबरच पारंपारिक प्रवाहाच्या विरुद्ध पोहत नवी आव्हाने पादाक्रांत करण्यासाठी उभे रहा. लिबरल आर्ट्स हे क्षेत्र तुम्हाला या रोमांचकारी अनुभवाबरोबरच विविध विषयातील ज्ञानाचे भांडार म्हणून सदैव मदत करेल, हे नक्की! लिबरल आर्ट्सचा विचार केला तर सुदैवाने पुणे शहरात अनेक ठिकाणी या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणाच्या जगात नावाजलेल्या अनेक संस्थांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या.

(लेखिका एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या विभागप्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com