आवडीच्या कामातील आनंद

डॉ. श्रीराम गीत
Thursday, 26 December 2019

आवडीच्या कामाबद्दल आनंद देणाऱ्या कामाबद्दल, त्यात करिअर करण्याबद्दल सध्या इतके भरभरून वाचायला मिळते, की साऱ्या जगात सारीच माणसे आवडीचे काम करताहेत, असा भास व्हावा. सेल्फ हेल्प गटातील वाचनीय पुस्तके, गाजलेली पुस्तके व सध्याची चलती असलेले एक नवीन प्रकरण म्हणजे ‘टेड टॉक’ यांना प्रचंड मागणी आहे. यू ट्यूबवर गेल्यास अशा साता जन्मांच्या सुफल कहाण्यांनी आपण अगदी भारावून जाऊ शकतो.

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
आवडीच्या कामाबद्दल आनंद देणाऱ्या कामाबद्दल, त्यात करिअर करण्याबद्दल सध्या इतके भरभरून वाचायला मिळते, की साऱ्या जगात सारीच माणसे आवडीचे काम करताहेत, असा भास व्हावा. सेल्फ हेल्प गटातील वाचनीय पुस्तके, गाजलेली पुस्तके व सध्याची चलती असलेले एक नवीन प्रकरण म्हणजे ‘टेड टॉक’ यांना प्रचंड मागणी आहे. यू ट्यूबवर गेल्यास अशा साता जन्मांच्या सुफल कहाण्यांनी आपण अगदी भारावून जाऊ शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र सेल्फ हेल्पचे पुस्तक बाजूला ठेवले, स्वभावावरचे रामबाण औषध किंवा उपाय वाचून झाले किंवा ‘टेड टॉक’मुळे आलेले भारावलेपण गेले तरी त्यातून स्वतःमध्ये आता, आज या क्षणापासून धडा घेणाराच या रस्त्यावर वाटचाल सुरू करू शकतो.

आपण वाटचाल सुरू करू शकतो, एवढेच बोलतो आहेत. पुढच्या वाटा, वळणे, चढणउतार, खाचखळगे त्याला एकट्याला पार करायचे असतात. ही असते फक्त नव्या करिअरची सुरुवात. यशापेक्षा आनंदाला, आवडीला त्यात प्राधान्य दिलेले असते. चैनीच्या, समृद्ध जीवनशैलीला कदाचित कायमचा निरोप दिलेला असू शकतो. 

एका निरीक्षणाची येथे नोंद करावी वाटते आहे. स्वतःचे घर वयाच्या विशीमध्ये सोडून, स्वतःचे गाव आणि ओळखीचा प्रांत सोडून अन्य देशात जाणारे मात्र स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पैशाने हे करणारे कोणीही अशाप्रकारच्या वेगळ्या रस्त्याचा विचार करू शकतात- करतात असे मात्र नाही. मग याचा सुवर्णमध्य साधणारे आपण सहजपणे आसपास पाहातच असतो की! यांची नावे न घेता भलीमोठी यादी कोणीही बनवू शकतो ना? 

डॉक्‍टर असून नाटक- सिनेमात, इंजिनिअर असून गायनवादनात माहीर, सामान्य नोकरीत असून असामान्य नट वा गायक, शिक्षकी पेशा सांभाळत अनोखे समाजकार्य उभे करणारे, सैनिकासाठी त्यांच्या एकटेपणावर मात करायला व मनाला उभारी द्यायला झोकून देणारे अनेकजण आपल्याला साऱ्यांनाच सहज आठवू शकतात. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वाचलेली दोन वाक्‍ये यावर खूप सांगतात. 

अभ्यास करून, शिकून, पदव्या मिळवून रोजीरोटीची शाश्‍वती मिळवता येते, मात्र आनंद हा ज्याचा त्याला शोधावा लागतो. या दोनाचा सुवर्णमध्य साधायचा तर? त्यातील एकातील करिअर करण्याचा अट्टहास सोडावा लागतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr shriram git article on career