नोकरी-बाजारपेठ : इलेक्ट्रिक मोबिलिटी विकास प्रक्रियेतील बदलांची नांदी

भारत मोबिलिटी क्षेत्रात वेगाने प्रगती करीत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलची निर्मिती आणि त्यात होत असणारा विकास या उद्योगक्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणत आहे.
electric mobility
electric mobilitysakal

भारत मोबिलिटी क्षेत्रात वेगाने प्रगती करीत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलची निर्मिती आणि त्यात होत असणारा विकास या उद्योगक्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणत आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील संशोधन आणि नव उपक्रमशीलता एकूणच दळणवळण क्षेत्राला वेगळी दिशा देईल.

पर्यावरणाबद्दलची वाढती सजगता, सरकारकडून या क्षेत्राला दिले जाणारे प्रोत्साहन आणि बॅटरी तंत्रज्ञानातील वेधक प्रगती यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणीच या क्षेत्रातील संधी वाढवत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी सज्ज व्हायला हवे.

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, त्याप्रमाणात या क्षेत्रात अनेक पातळ्यांवर नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यामुळे संशोधन आणि आरेखन, अभियांत्रिकी, निर्मिती, डिझाइन, विक्री आणि मार्केटिंग या आणि अशा अनेक विभागात तज्ज्ञ व्यावसायिकांची गरज वाढली आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना ही एक संधी आणि आव्हान असणार आहे.

विद्युत आणि इतर नवीन ऊर्जास्रोतावर आधारित वाहनांसाठी वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन आणि वेगवेगळ्या क्षमतांचा ऊर्जा स्रोत लागणार आहे. याशिवाय आकर्षक पॅकेजिंगची गरज लागणार असल्याने उत्तम डिझायनरची आवश्यकता भासणार आहे.

या क्षेत्रातील संधी त्यामुळे वाढल्या आहेत. वाहन आरेखन, वायुगतिकी (Aerodynamics), मटेरिअल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिकांना विद्युत वाहनांची कार्यक्षम आणि मोहक रचना करण्याच्या रोमांचक संधी यातून खुणावत आहेत.

‘बॅटरी’ हा ईव्ही मधील महत्त्वपूर्ण आणि निर्णायक घटक आहे. या वाहनांच्या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबरच बॅटरी तंत्रज्ञान, मटेरिअल सायन्स आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाढती मागणी आहे. भविष्यकाळात भारतात संशोधन, आरेखन आणि प्रगत विद्युतघट यंत्रणांची निर्मिती या क्षेत्रातील रोजगार, करिअरच्या संधींमध्ये प्रचंड मागणी संभवते.

विद्युत वाहनांच्या सर्वदूर स्वीकारासाठी ‘बॅटरी रिचार्जिंग’च्या पायाभूत सुविधेचाही विस्तार अत्यावश्यक आहे. हा विस्तार होत असताना नागरी सुविधांमध्ये बदल होणार आहे. चार्जिंगचे नेटवर्क तयार करण्यासाठी ते चालवण्यासाठी सिव्हिल इंजिनिअर, नगरनियोजक, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डिझायनर या सर्वांची गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपली स्कील वाढवावीत.

इलेक्ट्रिक मोबिलिटी उद्योग क्षेत्राचे स्वरूप आणि आकार ठरविण्यात शासकीय धोरणे आणि नियम यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे. पर्यावरण विषयक धोरण, ऊर्जा विषयक नियमन ईव्ही क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

ईव्ही उद्योगातून प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा डेटा, ग्राहक-चालकांचे अनुभव या वाहनांची कामगिरी, कार्यक्षमता अशा अनेक क्षेत्रात सुधारणा घडविण्यासाठी उपयोगी पडेल. या प्रचंड प्रमाणातील उपलब्ध डेटामधून आवश्यक माहिती मिळवण्यासाठी डेटा विश्लेषक, टेलेमॅटीक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशा क्षेत्रातील रोजगारांची-तज्ज्ञांची गरज तयार होईल.

(लेखक पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ईकेए मोबिलिटी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com