esakal | करिअर ‘ती’चे : मुलींसाठीचे पदविका अभ्यासक्रम

बोलून बातमी शोधा

Career}

मागील लेखांमध्ये आपण अभ्यास कसा करावा, स्पर्धा परीक्षांची तंत्रे याबद्दल माहिती घेतली. आता दहावी व बारावीनंतर काय करिअर निवडावे हे जाणून घेऊयात. सर्व मुलींनी व पालकांनी तीन गोष्टींचा विचार करावा.

education-jobs
करिअर ‘ती’चे : मुलींसाठीचे पदविका अभ्यासक्रम
sakal_logo
By
डॉ. सुलभा नितीन विधाते

मागील लेखांमध्ये आपण अभ्यास कसा करावा, स्पर्धा परीक्षांची तंत्रे याबद्दल माहिती घेतली. आता दहावी व बारावीनंतर काय करिअर निवडावे हे जाणून घेऊयात. सर्व मुलींनी व पालकांनी तीन गोष्टींचा विचार करावा. 

 • मुलींची आवड व कल
 • आपली आर्थिक स्थिती 
 • योग्य मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेकदा मैत्रीण जाते म्हणून ‘मी तेथे प्रवेश घेईल,’ असे ठरवले जाते. हे अंधानुकरण आहे. म्हणून प्रॅक्टिकल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुलींसाठी सुरक्षितता हा घटक महत्त्वाचा ठरतो. इयत्ता दहावीपर्यंत सर्व विषय अनिवार्य असतात. काही मुलींना आवड नसणाऱ्या विषयांचाही अभ्यास करावा लागतो. म्हणून करिअर निवडताना स्वतःच्या आवडली प्राधान्य द्यावे. मला कशात रस आहे, याचा विचार करावा. यासाठी मोठ्यांचे मार्गदर्शन गरजेचे आहे. म्हणून नियोजनपूर्वक माहिती मिळवावी. काही पुस्तके वाचावीत. आवडणारे, जमणारे व झेपणारेच विषय निवडावेत.

 • विविध पदविका कोर्सेस मुलींसाठी चांगले आहे. अभियांत्रिकी पदविका, सौंदर्य, आरोग्य, ऑनलाइन मार्केटिंग, मेडिसिन, कॉम्प्युटर कोर्सेस, ग्राफिक्स, ह्यूमन रिसोर्सेस, आयटीआय कोर्सेसमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाते. स्कील विकसित केले जातात. 
 • काही सहा महिन्यांचे डिप्लोमा कोर्सेस आहेत. 
 • सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग, डेटा मॅनेजमेंट, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिसिस, स्ट्रॅटिजिक मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना आता खूप मागणी आहे. त्यांच्या विविध वेबसाइट्स गुगलवर उपलब्ध आहेत. शासनमान्य प्रोफेशनल कोर्सेस निवडावेत. 
 • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ‘रेणुका स्वरूप करिअर कोर्सेस’ही उपलब्ध आहेत. यात टीचर्स ट्रेनिंग कोर्स, बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण, ब्यूटी पार्लर कोर्स, अॅडव्हान्स डिप्लोमा इन ब्यूटीकल्चर व त्यासंबंधी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच विविध कला-कौशल्य वर्गही उपलब्ध आहेत. यात मधुबनी पेंटिंग, इजिप्शियन पेंटिंग, पंचक्राफ्ट, कॉफी पेंटिंग, पेपर क्विलिंग, पॉट पेंटिंग, आर्टिफिशियल फ्लॉवर्स, सिरॅमिक्स, पणती डेकोरेशन, म्यूरल्स, मेहंदी, सोस पेसो आर्ट, वारली पेंटिंग, कॅलिग्राफी, फॅब्रिक पेंटिंग, बॅग मेकिंग, एम्ब्रॉयडरी, टॉप व सलवार पेपर कटिंग आदींचा समावेश होतो. 
 • नव्वद टक्के स्त्रिया नोकरी करतात, त्यामुळे त्यांची मुले शास्त्रोक्त पद्धतीने सांभाळण्यासाठी पाळणाघर प्रशिक्षण अभ्यासक्रम सध्या तेजीत आहेत. 
 • स्पोकन इंग्लिश व व्यक्तिमत्त्व विकास अभ्यासक्रमांनाही मोठी मागणी आहे. 
 • समुपदेशक अभ्यासक्रम समाजाची गरज बनली आहे. शालेय समुपदेशकापासून वृद्धांचे मानसिक बल वाढविण्यापर्यंत समुपदेशक पदाची व्याप्ती आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांत या जागा भरल्या जातात. 
 • पारंपरिक व अपारंपरिक पदविका कोर्सेसना आता मागणी आहे. 
 • हॉटेल मॅनेजमेंट, अॅनिमेशन, फोटो एडिटिंग, डीटीपी, फोटोग्राफी अशा क्षेत्रांतही संधी आहेत.
 • काही पदविका अभ्यासक्रमांनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. चित्रकलेची आवड असलेल्या मुलींनी वेगवेगळ्या वाटा स्वीकाराव्यात. फाइन आर्ट्समध्ये अनेक संधी आहेत.

काही अभ्यासक्रम मुलांना उद्योजक बनण्याची संधी देतात. त्यासाठी जिद्द, परिश्रम व कष्ट घेण्याची तयार, सृजनशीलता आवश्यक आहे! मुली निसर्गतःच उत्तम व्यवस्थापक असतात. मुलींना अनेक लघुउद्योग खुणावत आहेत. बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. अनेक महिलांनी जिद्दीच्या जोरावर आपले व्यवसाय विकसित केले आहेत. आकाशाला गवसणी घालण्याएवढे कार्य करून ‘मी नोकरी करण्यासाठी शिकले नाही, तर नोकरी देण्यासाठी शिकले,’ हे वाक्य सार्थ केले आहे. अशा सक्षम महिला उद्योजक समाजाची गरज आहेत. 

मुलींनो, चला सुरुवात करूयात. राष्ट्रउभारणीसाठी उद्योजक बनूयात...

Edited By - Prashant Patil