करिअर ‘ती’चे: पाया मुलींच्या विकासाचा...

करिअर ‘ती’चे: पाया मुलींच्या विकासाचा...

आजच्या आधुनिक युगात मुली व स्त्रियांची भूमिका खूपच बदललेली आहे. स्त्रीशिक्षणाचे महत्त्व जोतिबा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी ओळखले होते. म्हणूनच, मुली शिकू शकल्या, प्रगत झाल्या. नोकरीच्या व शिक्षणाच्या विविध संधी त्यांना मिळाल्या. पण, अजूनही मुलींना कोणते शिक्षण घ्यावे, कोणती शाखा निवडावी, आर्ट्‌स, सायन्स की कॉमर्स, हेच कळत नाही. या ‘रुटीन’ असलेल्या वाटांव्यतिरिक्त अन्य शाखा आहेत ना! फक्त त्यांची माहिती नसल्याने, मार्गदर्शन न मिळाल्याने, अनेक मुली खंत करतात. कुटुंबात शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसणे, स्वतःची कुवत न ओळखणे, अंधानुकरण अशा कारणांनी फक्त पदवी संपादन केली जाते. या शिक्षणाचा वापर योग्य प्रकारच्या नोकरीत, व्यवसायात किंवा उत्तम संधीत करता येणे, हे आव्हान ‘शिक्षण’ चालू असताना ठरवणे गरजेचे आहे. मुलींचे व्यक्तिमत्त्व व जडणघडण योग्य दिशेने होणे, सामाजिक परिवर्तन होणे, ही आजची गरज आहे.

मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. ‘स्त्री’ हा कुटुंबाचा ‘आस’ असते. संपूर्ण कुटुंब ‘आई’ नावाच्या व्यक्तिरेखेने गुंफलेले असते. म्हणूनच आता या लेखमालेतून मुलींचे शिक्षण, करिअर, त्यांच्यासाठीच्या योजना आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. देशात नवीन शिक्षण धोरण (एनईपी) तयार झाले असून, त्यात अनेक महत्त्वाचे बदल आहेत. महिलांचे सक्षमीकरण व सबल महिला यांना प्राधान्य आहे. एक आई मुलाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर चांगले वागणे, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम व आणखी कितीतरी संस्कार घडवते. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी निर्माण करायची असल्यास ‘स्त्री’ नावाचे विद्यापीठ सक्षम करणे आवश्‍यक आहे. औपचारिक शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, खेळ, लघुउद्योग यांमध्ये मुली जाऊ शकतात. आपले व्यक्तिमत्त्व, आवड, अंगभूत गुण व मेहनत घेण्याची तयारी असल्यास यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू होते. हवे आहे ते योग्य मार्गदर्शन व जिद्द! इयत्ता दहावीपर्यंतचा प्रवास सर्व मुलींचा समान प्लॅटफॉर्म असतो, पण याच प्रवासात अनेक सुप्त गोष्टी, आवडी निवडी, धडाडी व पुढील जीवनातील पैलू लपलेले असतात. शालेय स्तरावर ‘गुण’ न पाहता ‘अंगभूत गुणांचा ऐवज’ शोधणे ही महत्त्वाची पायरी आहे. चला तर मग, आपण अनेक गुणांचा शोध घेऊ व मुलींच्या विकासाचा व शिक्षणाचा पाया रचूया!!! 

(लेखिका पुण्यातील म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com