
आपण मागील लेखामध्ये इयत्ता दहावीपर्यंत शालेय जीवनात कोणकोणत्या स्पर्धा असतात, हे पाहिले. या लेखात आपण या स्पर्धा परीक्षांना बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मानसिकता कशी तयार करावी, अभ्यास कसा करून घ्यावा, हे पाहू.
आपण मागील लेखामध्ये इयत्ता दहावीपर्यंत शालेय जीवनात कोणकोणत्या स्पर्धा असतात, हे पाहिले. या लेखात आपण या स्पर्धा परीक्षांना बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मानसिकता कशी तयार करावी, अभ्यास कसा करून घ्यावा, हे पाहू.
शालेय जीवन मस्तीचे असते. या विद्यार्थिनींमध्ये भरपूर ऊर्जा असते. ती योग्य दिशेने वापरण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षांची तयारी व खेळ यांची सांगड घालणार आहोत. परीक्षा म्हटल्यावर त्या परीक्षेचे स्वरूप जाणून घेणे पहिली पायरी असते. प्रथम आपण पाचवी स्कॉलरशिप तंत्रे अभ्यासणार, नंतर आठवी स्कॉलरशिप तंत्रे पाहणार व त्यानंतर परीक्षांची तयारी मूलभूत तंत्रे पाहणार आहोत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खरे तर प्रत्येक परीक्षेचे संकल्पना चित्रण पुढीलप्रमाणे असते
हे स्वरूप समजावून घेऊन योग्य नियोजन, सुस्पष्ट संकल्पना व सराव या त्रिसूत्रीने अभ्यास केल्यास यश तुमचेच असते.
इयत्ता 5 वी स्कॉलरशिप स्वरूप
पेपर I : मराठी : 25 प्रश्न - 50 गुण गणित : 25 प्रश्न - 100 गुण एकूण गुण : 150
पेपर II : 25 प्रश्न : 50 गुण बुद्धिमत्ता : 50 प्रश्न - 100 गुण एकूण गुण : 150 सर्व मिळून एकूण गुण : 300
इयत्ता 8 वी स्कॉलरशिप स्वरूप
पेपर I : प्रथम भाषा : 25 प्रश्न - 50 गुण गणित : 50 प्रश्न - 100 गुण 75 प्रश्न : 150 एकूण गुण
पेपर II : तृतीय भाषा : 25 प्रश्न - 50 गुण
बुद्धिमत्ता चाचणी : 50 प्रश्न - 100 गुण 75 प्रश्न : 150 गुण सर्व मिळून एकूण गुण : 300
आवश्यक तंत्रे
आकलन होणे, शब्दसंपत्ती वाढविणे, कार्यात्मक, मूलभूत गणित, शब्दकोडे, Grammer, language study, Creative writing, Reading skill, Miscellaneous, Vocabulary.
वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती व अनुमान, प्रतिबिंब व प्रतिमा, समसंबंध, समानपद ओळखणे, कूटप्रश्न, गटाशी जुळणारे पद, सांकेतिक भाषा, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी समजावून घेऊन अभ्यास केला तर ‘करिअर’ उत्तम घडते. फक्त पुढे कोण होणार? हा प्रश्न मुलींना विचारून चालत नाही, तर तिच्या पुढच्या ‘करिअर’ची शिदोरी विकसित कशी करता येईल हे पाहणे आई-वडील व शिक्षकांचे कर्तव्य आहे. म्हणून योग्य दिशा व योग्य अभ्यासपद्धती गरजेची आहे. मुलींची खेळ त्यांनी खेळावेच, शिवाय मैदानी खेळांचा सराव मुलींना द्यावा. ‘स्व-संरक्षण’ हे तिचे तिलाच करता यायला हवे. या खेळांविषयी आपण स्वतंत्र लेख वाचणारच आहोत. खेळातून खिलाडू वृत्ती विकसित होऊन ‘उमदी मने’ फुलतात. अशाच ‘सुंदर मनांसाठी’ भेटूया आपण पुढील लेखात!
(लेखिका पुण्यातील म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्या आहेत.)
Edited By - Prashant Patil