‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासाचे बुलेट पॉइन्ट्स

अभ्यासात दरवेळेस सर्व वाचत बसणे वेळ खाणारे असते. त्यामुळे पुनर्अवलोकन, उजळणी यांसारखे अभ्यासाचे प्रकार किचकट बनायला लागतात.
Online Education
Online EducationSakal

अभ्यासात दरवेळेस सर्व वाचत बसणे वेळ खाणारे असते. त्यामुळे पुनर्अवलोकन, उजळणी यांसारखे अभ्यासाचे प्रकार किचकट बनायला लागतात. त्यामुळेच अभ्यास हा एक कंटाळा आणणारा आणि बराच काही कराव लागणारा वेळखाऊ असा प्रकार होऊन जातो. हेच अभ्यासाचे मुद्दे थोडक्यात, काही शब्दांतच मांडलेले असतील तर अभ्यास हा आनंददायी, पटकन होणारा आणि अर्थपूर्ण होतो. केवळ मुद्याला धरूनच अभ्यास बेतलेला असेल, तर तो सहज जमूनही जातो. प्रत्येक प्रकरणात असणारी माहिती महत्त्वाच्या मुद्यांच्या स्वरूपात वेगळी काढता आली आणि त्याची मांडणीही थोडक्यात करता आल्यास जास्तीत जास्त माहिती अभ्यासणे सोपे जाणार. म्हणूनच प्रत्येक प्रकरणातील प्रमुख माहिती ही बुलेट पॉइंटच्या स्वरूपात मांडता यायला पाहिजे.

बुलेट पॉइन्ट्स कसे तयार कराल?

बुलेट पॉइन्ट्स म्हणजे महत्त्वाचे मुद्दे. ते कसे काढायचे ते ठरवले पाहिजे. आपण एखादे प्रकरण वाचतो तेव्हा त्यातील जरुरीचे असे शब्द, मुद्दे, संकल्पनानिहाय वेगळे लिहून काढले की आपली एक यादीच तयार होईल. असे मुद्दे एकाखाली एक लिहीत गेलो, की त्याला बुलेट पॉइन्ट्सचे स्वरूप येईल. बुलेट याचा अर्थ प्रत्येक मुद्यासमोर एक विशिष्ट अशी खूण करायची, केवळ क्रमांक देण्याऐवजी काही चिन्हांचा वापर करता येईल. यात खास करून अशा चिन्हांचा वापर मुद्दे वेगवेगळे मांडण्यासाठी करता येईल. प्रत्येक संकल्पनेमध्ये काही महत्त्वाचे असे मुद्दे असतात ज्यांच्या शिवाय ती संकल्पना मांडणे अवघड होऊन जाते. अशाच मुद्यांचा इथे विचार करता येईल. पूर्ण वाक्यांचा विचार न करता केवळ मुद्दे घेउन संपूर्ण प्रकरण मांडता येईल.

बुलेट पॉइन्ट्सचा उपयोग कसा करायचा?

अशी मांडणी आपल्या उत्तरासाठी केली, तरी त्यामुळे सर्व मुद्दे लक्षात घेतले गेले की नाही ते पण समजेल. उत्तर अर्धवट राहणार नाही. उत्तराची मांडणी करताना याच थोडक्यात पण महत्त्वाच्या मुद्यांचे स्पष्टीकरण करत राहता येईल. एकदा कोणते मुद्दे उत्तरात आवश्यक आहेत ते लक्षात आले म्हणजे त्याला आवश्यक असा कल्पनाविस्तार, उदाहरणे, देऊन मांडणी करत राहता येईल. जेणे करून आपले उत्तर हे जास्त परिपूर्ण होईल. शेवटी अभ्यास म्हणजे काय तर सर्वंकष माहिती मधून संक्षिप्त मुद्दे मिळवणे आणि मग त्याच मुद्यांचे विषदीकरण करत जायचे. बुलेट पॉइन्ट्सचा वापर हा त्यामुळे अभ्यासातला आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com