‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासातले शॉर्टकट्स | Study Shortcuts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासातले शॉर्टकट्स
‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासातले शॉर्टकट्स

‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासातले शॉर्टकट्स

प्रत्येक विषयातील अभ्यासाची व्याप्तीही सतत वाढत जाणारी आहे. त्यामुळे ही वाढत जाणारी माहिती लक्षात ठेवणे हे एक आव्हानच असते. आणि सारखं पाठ करायचाही कंटाळा येऊन जातो खरंकी नाही. त्यामुळे प्रत्येक संकल्पनेतील अत्यंत आवश्यक, महत्त्वाचे असे काही शब्द लक्षात ठेवले की झाले. त्या शब्दावर आधारितच संपूर्ण माहिती असते. त्या शॉर्टकर्टसवरून विचारांचा विस्तार परीक्षेत केला की झाले. ज्या प्रमाणे संगणक चालवताना काही ‘शॉर्ट कट की’ चा वापर आपण करतो त्याच प्रमाणे अभ्यास करताना काही शब्द, अक्षर स्मरणात ठेऊन आपण पूर्ण उत्तरच लक्षात ठेऊ शकतो. अभ्यास करताना प्रत्येक वेळेस किती वाचावे याला मर्यादाच रहात नाही. उत्तर लक्षात ठेवायचे म्हणजे ते शब्दशः वाक्यामागून वाक्ये लक्षात ठेवायचे असा अर्थ होत नाही. म्हणूनच शॉर्ट कट्चा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त माहिती कमीतकमी शब्दात लक्षात ठेवायची सवय लागते.

प्रत्येक वेळेस अशा काही ट्रिक्स आपल्याला वापरता येतात की ज्यांच्या साहाय्याने आपण हवे ते लक्षात ठेऊ शकतो. कोणत्या महिन्यात किती दिवस असतात पाठ करत बसण्याची आवश्यकता नाही. केवळ हाताची मूठ आवळा आणि उंचवटे आणि खोलगट भाग यांच्या साहाय्याने ते लक्षात ठेवा. शॉर्ट कट म्हणून केवळ काही खुणा, चिन्हे सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आपले शॉर्ट कटचे प्रकार आपणच तयार केले तर ते जास्त चांगले लक्षात राहू शकतात.

आता हे उदाहरण पहा या एका वाक्याच्या लक्षात ठेवण्याने तुम्हाला सर्व ग्रह आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवणे शक्य होइल. My Very Enthusiastic Mother Just Served Us Nine Pizaas! That is Mercury, Venus, Earth, Marce, Jupiter, Urenus, Neptune, Pluto.

X axis हा आडवा असतो तर Y axis हा उभा असतो हे लक्षात ठेवणे सुरुवातीला अवघड जाते. तर एक शॉर्ट कट लक्षात ठेवलं की झालं. X is earth and Y is the sky.

नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे body nutrients सांगा. त्यासाठी केवळ पुढील एकच वाक्य लक्षात ठेवले की झाले. To remember six nutrients: Who Can Protect My Vital Lips? (Water, Carbohydrates, Proteins, Minerals, Vitamins, Lipids).

यासाठी नेहमी अभ्यासाचे वाचन करत असताना प्रमुख मुद्यांचे शॉर्ट कट्स बनवता आले पाहिजेत. हे शॉर्ट कट्स प्रत्येक प्रकरणनिहाय वेगळे असे लिहून ठेवता येतील. या शॉर्ट कट्सची उजळणी करणे एकदम सोपे जाईल. त्यामुळे तुमचा अभ्यासाचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचतच होइल. आयत्या वेळेस अभ्यासाचे कमी वेळात पुर्नावलोकन करणे शक्य होईल.

हे सगळं जरी खरं असलं तरी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे ‘There are no shortcuts to success.’ अविरत परिश्रमाला पर्याय नाही. हे मात्र निश्चित.

loading image
go to top