संवाद : लेखनात चतुरस्र विचार फायद्याचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam

कोणत्याही परीक्षेतील कामगिरी लेखी प्रतिसादावरच अवलंबून असते. तुम्ही लिहिलेले उत्तर हेच तुम्हाला काय येते आणि कितपत समजले आहे याचे द्योतक असते.

संवाद : लेखनात चतुरस्र विचार फायद्याचा

कोणत्याही परीक्षेतील कामगिरी लेखी प्रतिसादावरच अवलंबून असते. तुम्ही लिहिलेले उत्तर हेच तुम्हाला काय येते आणि कितपत समजले आहे याचे द्योतक असते. तुम्हाला कितीही चांगले समजले असले तरी ते मांडता कसे आले यावरच गुण मिळत असतात. म्हणूनच लेखन कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक प्रश्नाला, समस्येला दोन बाजू असतात. त्या म्हणजे फायदा आणि तोटा. आपण प्रत्येक घटनेकडे अशा दोन्ही अंगांनी विचार करण्याची सवय लावली पाहिजे. अशा दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा आपल्या लेखनाला एक वेगळीच दिशा मिळते. उच्चतम बोधात्मक क्षमतांचा विचार करता एखाद्या समस्येबद्दल चोहोबाजूने विचार करण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. यातूनच कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत होते.

अभ्यासाच्या घटकांबाबत नेहमी दोन विचार असू शकतात. अशा दोन्ही बाजूंचा विचार होणे गरजेचे आहे. केवळ एकाच बाजूने विचार करायला लागल्यास त्या समस्येबद्दल केवळ एकच विचार आपल्याला कळतो दुसरा विचार आपण लक्षात घेत नाही किंवा दुर्लक्षित करतो. दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा आपला अभ्यास परिपूर्ण व्हायला लागतो. एकांगी विचार करत राहिल्याने नावीन्याची भर पडत नाही. प्रत्येक विषयात असे दिलेल्या माहितीच्या पलिकडे जाणे आवश्यक असते. यातूनच आपल्या विचारकौशल्याला एक नवीन आयाम प्राप्त होतो.

प्रत्येक संकल्पनेकडे दोन बाजूंनी पाहता येते. गणित सोडवताना एकाच रितीचा, पद्धतीचा विचार न करता दुसरी एखादी पद्धत लागू होते आहे का याचा विचार करता येईल. असाच विचार विज्ञान विषयातून एखादी घटना सिद्ध करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील सुचवलेल्या एका मार्गापेक्षा पर्यायी मार्गाचा विचार करता येईल. या वेगळी वाट शोधण्यात आपल्याला कदाचित नवा आणि सोपा मार्ग सुचू शकतो. याचा उपयोग आपल्याला ती संकल्पना लक्षात घ्यायला होऊ शकतो. प्रत्येक समस्येच्या बाबतीत काही जमेच्या बाजू असतात तर काही विपरीत परिणाम करणाऱ्या. त्या दोन्ही बाजूंचा विचार करणे गरजेचे आहे.

विशेषत- निबंधवजा उत्तर अपेक्षित असते तिथे स्वत-चे मुद्दे वापरणे आवश्यक असते. ते या युक्तीच्या, तंत्राच्या साहाय्याने सहज शक्य होते. भाषा विषयातून लेखनाची तयारी करताना दिलेल्या विषयावर विचार करताना फायदा आणि तोटा असा दोन्ही बाजूंनी विचार केल्यास आपल्याला लेखनाची एक नवीन दिशा मिळू शकते. कोणताही विषय घेऊन त्याचा असा विचार प्रकटपणे करत बसल्यास आपल्याला लिहिण्यासाठी अनेक मुद्दे मिळू शकतात. आपले लेखन हे अधिक परिपूर्ण आणि परिणामकारक होण्याचा दृष्टीने असा हा चौफेर केलेला विचार तुम्हाला जास्त समृद्ध करून जातो. तर मग आता लिहायला बसल्यावर काय लिहू हा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही.

Web Title: Dr Umesh Pradhan Writes Clever Thinking Is Beneficial In Writing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..