संवाद : यशासाठी जिद्द आवश्यकच

परीक्षेतील देदीप्यमान यशानंतरच्या मुलाखतीमध्ये विद्यार्थी नेहमी आग्रहाने सांगतात, की ‘हे यश जिद्दीच्या जोरावरच मिळवू शकलो.’ काय असते ही जिद्द? ती कशी मिळवायची असते?
Success
SuccessSakal
Summary

परीक्षेतील देदीप्यमान यशानंतरच्या मुलाखतीमध्ये विद्यार्थी नेहमी आग्रहाने सांगतात, की ‘हे यश जिद्दीच्या जोरावरच मिळवू शकलो.’ काय असते ही जिद्द? ती कशी मिळवायची असते?

परीक्षेतील देदीप्यमान यशानंतरच्या मुलाखतीमध्ये विद्यार्थी नेहमी आग्रहाने सांगतात, की ‘हे यश जिद्दीच्या जोरावरच मिळवू शकलो.’ काय असते ही जिद्द? ती कशी मिळवायची असते? त्याचा अभ्यासात आणि यशात कसा उपयोग होऊ शकतो? जिद्द ठेवणे म्हणजे मी नक्की काय करू शकतो? अभ्यासाविषयी असे अनेक शब्द वापरले जातात त्यांचा अर्थबोध करून घेणं गरजेचं. अर्थाबरोबर कोणती कृती करायची ते समजणं महत्त्वाचे. नाहीतर शब्दांचे अर्थ बोथट होऊन जातात. आता ‘जिद्द’ या शब्दाचेच बघा.

यश मिळत नाही तोपर्यंत अविरत काम करत रहाणं म्हणजेच जिद्द. परिस्थिती बदलली, अडचणी आल्या, अपयश आले, समजत नसले, अशा कोणत्याही कारणाने आपण हातात घेतलेले काम क्षणात बाजूला टाकतो आणि वेगळेच काम हातात घेतो. हातातले सोडून पळत्याच्या मागे आपण लागतो. आपली आवड निवड क्षणोक्षणी बदलत असते. कोणत्याही एकाच कामात आपले जास्त वेळ लक्ष लागत नाही. एखाद्या फुलपाखराप्रमाणे आपलं मन सतत बदलत असते. जिद्दी माणसाचे नेमके असे नसते. तो एकच गोष्ट घेऊन बसतो आणि त्याचा निकाल लावतो.

अभ्यासात असे प्रयत्न करायचे की कोणत्याही प्रकारचे अडथळे आले तरी तो सुरूच ठेवायचा. त्यासाठी स्वतःवर बंधने घालून घ्यायची असतात. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन केलेल्या कोणाचेही उदाहरण घ्या. त्यांच्या यशाचे रहस्य ते या जिद्दीमध्येच लपले असल्याचे सांगतील. सातत्याने, अविरत, मन लावून एकच-एक काम करत राहिलो तर यश का बरं मिळणार नाही? आपल्या स्वभावात असे एकव्रतीपणा नसेल तर मात्र खास प्रयत्न जाणीवपूर्वक करावे लागतील.

अमुक एक उद्दिष्ट साध्य करणार म्हणजे करणारच, आज मी अमुक एक विषयाचा अभ्यास संपवणार म्हणजे संपवणारच, पाठांतरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मी ध्यानपूर्वक समजून घेणारच. हेच काम तुम्हाला जिद्दी बनवू शकेल. आपल्या उद्दिष्टांबाबत दुर्दम्य इच्छाशक्ती जोपासणं म्हणजेच जिद्दी रहाणं. वेळोवेळी उद्दिष्ट बदलू नका. जोपर्यंत एक उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत पुढच्या कामाला हात लावू नका. हाती घ्याल ते शेवटपर्यंत पूर्ण कराल तरच जिद्द उपयोगाची होईल.

जिद्द राखण्यासाठी आवश्यक असतो मनाचा निश्चय, निग्रह करण. निर्धार पूर्ण होईल की नाही अशी कोणतीही शंका मनात न ठेवता प्रयत्न करत राहणं आवश्यक असतं. स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून एकाग्रता वाढवा आणि तुमचे प्रयत्न कसे यशस्वी होत आहेत ते स्वतःच अनुभवा. विद्यार्थ्यांनो, या लेखमालेच्या माध्यमातून विविध विषयांवर आपणाशी संवाद साधता आला. हा संवाद आपल्यालाही नक्कीच आवडला असणारच, अशी मला खात्री आहे. आपणास सांगितलेल्या विविध संकल्पनांना आपण पुढील आयुष्यात नक्कीच उपयोग कराल अशी आशा आहे. आपणा सर्वांना शुभेच्छा..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com