संवाद : स्वयंअध्ययन

शिकण्याची पद्धत म्हणून स्वयंअभ्यास म्हणजे दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वत-च अभ्यास करणे होय. स्वत: स्वयं-अनुभवाद्वारे शिकण्याची अपेक्षा येथे असते.
Self Study
Self StudySakal
Summary

शिकण्याची पद्धत म्हणून स्वयंअभ्यास म्हणजे दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वत-च अभ्यास करणे होय. स्वत: स्वयं-अनुभवाद्वारे शिकण्याची अपेक्षा येथे असते.

प्रत्येक शिक्षण मूलत- आत्मशिक्षणच असते. ज्ञानरचनावादाचा असा विश्वास आहे की प्रत्येक मूल आपले ज्ञान स्वत- तयार करत असते. शिकण्याची पद्धत म्हणून स्वयंअभ्यास म्हणजे दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वत-च अभ्यास करणे होय. स्वत: स्वयं-अनुभवाद्वारे शिकण्याची अपेक्षा येथे असते. यात महत्त्वाची भूमिका ही स्वयंनिर्देशित शिकण्याची असते. म्हणजेच स्वत-लाच सूचना देत समजून घेणं आवश्यक असते. आपणच स्वत-ला सतत प्रशिक्षण देत राहणे गरजेचे. स्वसंवाद आत्मशिक्षणाकडे घेउन जातो.

स्वयंशिक्षण का?

तुम्ही समस्येशी संघर्ष करण्यास सुरुवात करता तेव्हा शक्यतो उपाय, उत्तर शोधायला लागता. जे स्वत-च्या अनुभवावर अवलंबून असतात. हे केवळ स्वयंशिक्षण प्रक्रियेद्वारे शक्य आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या व्याख्यानातून ते शक्य होत नाही. सर्व विद्यार्थ्यांकडे शिक्षणाची समान गती असतेच असे नाही. प्रत्येक व्यक्तीकडे एका मुद्द्याकडे पाहण्याचा वेगळा मार्ग असतो. म्हणून, स्वत:चे शिक्षण स्वत-च्या वेगाने करण्यास यामुळे मदत होते. प्रत्येक मुलाने त्यासाठी स्वयंशिक्षणाचा मार्ग शोधला पाहिजे. स्वत-लाच समस्यांचे निराकरण शोधण्यास प्रोत्साहित, प्रेरित करणे आवश्यक आहे. तुम्ही शिकण्यासाठी स्वत- जबाबदार असता. यासाठी पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त माहितीचे विविध स्रोत आणि कौशल्ये वापरणे शक्य आहे.

स्वयंअध्ययनाच्या पायऱ्या

1) पहिला टप्पा - स्वत:ची प्रेरणा आणि शिकण्याची उत्सुकता आवश्यक असते. आपण आपल्या पालकांच्या, शिक्षकांच्या किंवा इतर कोणासाठीही शिकत नाही, आपण स्वत-च्या उन्नतीसाठी शिकतो. आपण शिकतो कारण ती आपली गरज असते. तुम्ही आणि तुम्ही एकटेच तुमचे भविष्य घडवू शकता.

2) दुसरा टप्पा - आपल्या अभ्यासाची उद्दिष्टे ठरवा. वर्षाच्या शेवटी आपण काय साध्य करू इच्छिता यासारखे दीर्घकालीन उद्दिष्ट झाले. अगदी अल्प मुदतीचा हेतू असू शकतो जसे की, आज मी पहिल्या कवितेमधील शब्दार्थ समजून घेणार आहे. शिक्षकांनी पाठविलेले वर्कशीट सोडवणार आहे.

3) तिसरा टप्पा - एखादी प्रारंभिक कृती ज्यामध्ये पुढील कामांसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, आनंददायक आणि प्रेरणा असेल. या क्रियेमुळे पुढे मुख्य कृती करण्यास आपण तयार व्हाल.

4) चौथा टप्पा - मुख्य कृती काय करायची आहे ते ठरवा. काय अपेक्षित आहे याबद्दल स्पष्ट सूचना नक्की करा. त्यांची विविध पायऱ्यांमध्ये रचना करा. शिकण्याच्या प्रक्रियेचा विचार करून कृतींची रचना करा. स्वयंअध्यनासाठी लागणारे सर्व टप्पे आपल्यासाठी स्पष्ट झाले आहेत का हे पहा.

5) पाचवा टप्पा - सूचना, टिप्स, तंत्रे, मंत्रे, उदाहरणे, स्पष्टिकरणांच्या मार्गात मदत देऊन प्रक्रिया सुकर करा. अशी कल्पना करा की जणू आपण एका वर्गात शिकत आहात आणि स्वत-ला सूचना देत आहात.

6) सहावा टप्पा - वेळ पाळण्याविषयी जागरूक राहा. प्रत्येक क्रियेसाठी वेळ मर्यादा घालून घ्या. दिलेल्या वेळेचे अनुसरण करण्याचा स्वत-शी आग्रह धरा. ठरावीक कालावधीत कृती झालीच पाहिजे असा वेग ठेवा.

7) सातवा टप्पा - स्वत:चे मूल्यांकन करण्यासाठी कृतींची रचना करा. निकषांसह एक सोपी कृती दिली पाहिजे. शिकणे झाले आहे की नाही याचे निर्देशक स्पष्ट असले पाहिजेत.

एकलव्याप्रमाणे स्वत-ला घडवण्यातच आपली खरी प्रगती अवलंबून आहे. स्वयंअध्ययनाचे तत्त्व म्हणजे स्वयंप्रेरित व्हा, उद्दिष्ट ठरवा, सराव करा, आत्मपरिक्षण करा. इतर काय करतात यापेक्षा मी काय करतो ते महत्त्वाचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com