संवाद : अभ्यासासाठी प्रतिलिपी तंत्राचा वापर

प्रतिलिपी म्हणजे अगदी चक्क कॉपी करा! अर्थात तुम्हाला माझा हा सल्ला कदाचित हस्यास्पद आणि अशैक्षणिक वाटेल.
Online Study
Online StudySakal
Summary

प्रतिलिपी म्हणजे अगदी चक्क कॉपी करा! अर्थात तुम्हाला माझा हा सल्ला कदाचित हस्यास्पद आणि अशैक्षणिक वाटेल.

प्रतिलिपी म्हणजे अगदी चक्क कॉपी करा! अर्थात तुम्हाला माझा हा सल्ला कदाचित हस्यास्पद आणि अशैक्षणिक वाटेल. मी तुम्हाला कॉपीसारख्या गैरमार्गाचा वापर करायला प्रोत्साहन देतो आहे की काय असेही तुम्हाला वाटेल. कॉपी करण्यात कसला आलाय अभ्यास? उलट हे तर करू नका असेच आम्हाला सांगितले जाते. येथे तुम्ही तर चक्क आम्हाला कॉपी करायला सांगता आहात.

परीक्षेच्या काळात कॉपी करणे केव्हाही वाईटच. तो एक गुन्हाच समजला जातो. परंतु अभ्यास करताना मात्र समोरचे पाहून नीट लिहिणं यालाही एक प्राथमिक अभ्यास म्हणून तितकेच महत्त्व आहे. असे करत असताना आपण समोर दिलेले वाचत असतो निरिक्षण करत असतो आणि हाताने ते लिहून काढत असतो. लिहिता लिहिता त्या विषयाचा आपला अभ्यास होऊन जातो. पहिलं म्हणजे प्रतिलिपी याचा साधा अर्थ म्हणजे समोरचे पाहून लिहिणे. अर्थात येथे ते लक्षपूर्वक लिहिणे अपेक्षित आहे. केवळ जे दिसते आहे ते उतरवून काढणे नाही तर त्यातील अर्थ, माहिती समजून घेऊनच लिहिले गेले पाहिजे. आपण जे लिहितो आहोत ते समजून मगच पुढे जायला हवे.

पाहून लिहीत असताना, चांगले, सर्वोत्तम जे अपेक्षित आहे ते चांगल्या प्रकारे लिहिता यायला पाहिजे. यात गुणवत्ता वाढवण्याच्याही अपेक्षा ठेवता येईल. एखाद्या चांगल्या गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या शिक्षकांनी दिलेले नमुना उत्तर परत परत लिहून काढले तर आपल्याला चांगले उत्तर देण्याची आपोआप सवय होते. चांगले उत्तर कशाला म्हणतात ते समजते आणि नकळत आपण पण तसाच प्रयत्न करायला लागतो. आपण पण त्याच पद्धतीने स्वत-चे उत्तर देऊ लागतो. अनुकरण ही अभ्यासातील एक चांगली सवय आहे. चांगले त्याची प्रतिलिपी करणं म्हणजे एक प्रकारे स्वत-च्या मनाला डोक्याला चांगल्याची सवय लावणेच आहे. प्रत्येक जण खरंतर अगोदरच्या माणसांचे पाहूनच शिकत असतो आणि मग त्यात स्वत-ची भर घालायला शिकतो.

वर्गात शिकत असताना फळ्यावरील दिलेले उदाहरण, उत्तर, शब्द आपण पाहून लिहीत असतो. त्याचा फायदा आपल्याला अनेक प्रकारे अभ्यास करताना होत असतो. प्रतिलिपीचा मुख्य फायदा म्हणजे आदर्श ते आत्मसात करणे. हस्ताक्षर सुधारणे, विरामचिन्हे योग्य प्रकारे वापरायला शिकणे असे अनेक फायदे देता येतील. प्रतिलिपी करत असताना प्रामुख्याने इंग्रजीच्या बाबतीत आपली स्पेलिंग सुधारू शकतात. इतर भाषांच्या बाबतीत ऱ्हस्व व दीर्घ या संकल्पना जास्त स्पष्टपणे आत्मसात करता येतात. याशिवाय आपला लिहिण्याचा वेग वाढू शकतो. पाहून लिहिण्याने डोळे आणि वाचनाचे साहित्य यामधील समन्वय जास्त वेगाने होतो. परीक्षेच्या वेळेस प्रश्नपत्रिका वाचन व लेखन ठराविक वेळेतच होणे अपेक्षित असते ते यातून शक्य होते.

जो परिच्छेद किंवा उत्तर पाहून लिहायचे आहे ते अगोदर नीट वाचून घेतले पाहिजे. त्यानंतर असे उत्तर सलगपणे न थांबता लिहून काढले तरच प्रतिलिपी करण्याचा फायदा होऊ शकतो. चांगले उत्तर कशाला म्हणतात, उत्तरातील सर्व मुद्दे लिहिले गेले आहेत किंवा नाही यासारखी गोष्ट प्रतिलिपी अर्थात पाहून लिहीत असताना शिकता येऊ शकते. परीक्षेतही प्रश्नपत्रिकेतील अनेक शब्द वाक्य आपल्याला लिहावी लागतात त्याचा सराव या निमित्ताने होऊ शकतो अर्थात पाहून लिहीत असताना चूक झाली तर त्याला माफी नाही. अभ्यास कसा करावा तर दिलेले उत्तर परत परत पाहून लिहून काढून तो पक्का करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com