करिअर अपडेट : आरोग्य, वैद्यकीय पर्यटन

‘अतिथी देवो भवः’ ही भारतीय संस्कृती आहे आणि हेच पर्यटनाचे मूलभूत तत्त्व आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, विविधतेने नटलेल्या भारताची वैद्यकीय समृद्ध परंपरा आपल्याला वेदकाळात घेऊन जाते.
Medical
MedicalSakal
Summary

‘अतिथी देवो भवः’ ही भारतीय संस्कृती आहे आणि हेच पर्यटनाचे मूलभूत तत्त्व आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, विविधतेने नटलेल्या भारताची वैद्यकीय समृद्ध परंपरा आपल्याला वेदकाळात घेऊन जाते.

- डॉ. वंदना जोशी

‘अतिथी देवो भवः’ ही भारतीय संस्कृती आहे आणि हेच पर्यटनाचे मूलभूत तत्त्व आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, विविधतेने नटलेल्या भारताची वैद्यकीय समृद्ध परंपरा आपल्याला वेदकाळात घेऊन जाते. त्याचबरोबर चरक संहिता व सुश्रुत संहितेमध्येही आधुनिक उपचार पद्धती व शस्त्रक्रियेचा उल्लेख आहे.

निसर्गोपचार, युनानी, आयुर्वेदिक व होमिओपॅथी या उपचार पद्धतीचा वापर ॲलोपॅथी बरोबर भारतात होतो. भारतातील प्रसिद्ध अशा योग व ध्यान धारणेचा प्रसार व वापर जगभरात झालेला आहे. वैद्यकीय पर्यटनामध्ये परदेशात जाऊन अनेक आजारांवरील जागतिक दर्जाचे उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी केलेला प्रवास असला तरी रुग्णांना घरी असल्याची जाणीव सेवांद्वारे करून देण्यात येते. भारतातील आरोग्य पर्यटनामध्ये पर्यटकांच्या उपचार व शस्त्रक्रियेनंतर त्यांना भारतामध्ये विविध व मुबलक असणाऱ्या पर्यटन स्थळांमध्ये विश्रांतीसाठीची व्यवस्था केली जाते.

२०१९ मध्ये जगभरात सुमारे १.४० कोटी लोकांनी आरोग्य व वैद्यकीय कारणासाठी प्रवास केला आहे. भारताचा वैद्यकीय पर्यटनामध्ये ४६ देशांच्या यादीत दहावा क्रमांक आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, ओमान, बांगलादेश, मालदीव, नायजेरिया, केनिया, इराक या देशातील पर्यटक कॅन्सरवरील उपचार, दंत उपचार, कॉस्मेटिक व प्लास्टिक सर्जरी इतर उपचारांसाठी भारतात येतात. भारत हा वैद्यकीय पर्यटनासाठी योग्य हा देश ओळखला जात असून त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. उपचार पद्धतीची गुणवत्ता, त्यासाठी उपलब्ध श्रेणी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पायाभूत सुविधा, सुसज्ज दवाखाने, कुशल व योग्य डॉक्टर, शून्य प्रतीक्षा कालावधी आणि सर्वांत मुख्य जागतिक दर्जाच्या सेवा परवडणाऱ्या किमतींमध्ये, ‘ग्लोबल वेलनेस टुरिझम’ हा वैद्यकीय पर्यटनाचा एक भाग आहे.

वैद्यकीय पर्यटनामध्ये पर्यटकांसाठी व त्यांच्या सोबत येणाऱ्या व्यक्तींसाठी मेडिकल व्हिसा, विमान तिकिटे, हॉस्पिटल, इन्शुरन्स कंपन्यांशी समन्वय, विमान तळावरून हॉस्पिटल किंवा हॉटेलमध्ये आणण्याची व्यवस्था त्याचबरोबर त्यांच्यासाठी उपचारानंतर पर्यटनस्थळावरील राहण्याची इतर गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता, गुरगाव, बंगळूर, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम ही शहरे आरोग्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. येथे उपचार घेऊन पर्यटक जवळच्या पर्यटन स्थळाला भेट देऊन, विश्रांती घेऊन पर्यटनाचा अनुभव व आनंद घेऊ शकतात.

भारत सरकार या पर्यटनासाठी इ-मेडिकल व्हिसा व परदेशी पर्यटकांसाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, गोवा व कोलकता येथे सुविधा केंद्रांची उभारणी केली आहे.

वैद्यकीय पर्यटनासाठी भारतामध्ये काही संस्था, प्रमाणपत्रे, डिप्लोमा, पदव्युत्तर पदविका आणि एम.बी.ए असे अभ्यासक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये एथिकल अँड लीगल प्रोसिजर व त्यासंबंधी उद्‍भवणाऱ्या समस्या, वैद्यकीय प्रणाली भारतातील मुख्य व वैद्यकीय पर्यटनाच्या सेवा देणारे रुग्णालये इ. माहितीचा समावेश आहे. त्यासाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम ज्यामध्ये वैद्यकीय पर्यटन हा एक विषय आहे किंवा पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम केल्यास उपयुक्त ठरू शकतो. वैद्यकीय पर्यटनासाठी अपेक्षित कौशल्ये, जेणेकरून परदेशी पर्यटकाला आवश्यक असे उत्तम रुग्णालये निवडण्यास मार्गदर्शन होऊ शकते.

आवश्यक कौशल्य

  • वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध व उपयुक्त असणाऱ्या विविध स्थळांचे उत्तम ज्ञान.

  • आरोग्य सेवा, त्यासंबंधीचे कायदे व नियम, रुग्णालये, त्याचे रेटिंग, प्रायसिंग, मान्यता इ. माहिती.

  • मेडिकल व्हिसाची पूर्ण माहिती आणि उत्तम संभाषण व नेतृत्व गुण

  • या क्षेत्रात ‘कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर’ व ‘मेडिकल टूर कन्सल्टंट या स्वरूपात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com