फिजिक्स विषय अवघड जातोय? 'अशी' करा तयारी..

physics
physics

क्रिकेटमध्ये संघ जिंकण्यासाठी एकूणच खेळ उत्तम असावा लागतो, हे मान्य! पण  अटीतटीच्या वेळी शेवटचा चेंडू निर्णायक होतो ना? तसेच जरी बऱ्याच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी या विषयांचे गुण ग्राह्य धरले जातात. परंतु फिजिक्स हा विषय नेहमीच निर्णायक ठरला आहे. आतापर्यंत उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालावरून हे प्रकर्षाने अधोरेखित होते. तथापि बहुतांश विद्यार्थी फिजिक्स विषयात तुलनात्मक कमी का पडतात, याची मीमांसा करूया!

- फिजिक्स विषयाचे स्वरूप : फिजिक्समध्ये संकल्पना या आकृत्या आणि गणिती भाषेत मांडलेल्या असतात, समीकरणे सोडवावी लागतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा भाग म्हणजे त्या संकल्पनावर आधारित गणितीय उदाहरणे सोडवणे. फिजिक्स  विषयाचे उच्च माध्यमिक मंडळाचे पेपर्स थोडे अवघड वाटण्याचे दुसरे कारण असे की अकरावीमधील अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष!  विद्यार्थ्याकडून बारावीतील बऱ्याच संकल्पना अकरावीच्या अभ्यासाला गृहीत धरून समाविष्ट केलेल्या आहेत. काही उदाहरणे सोडवताना अकरावीच्या मूलभूत संकल्पना वापराव्या लागतात. विशेष करून सीईटी, जेईई सारख्या परीक्षा तर विद्यार्थ्यांचे सर्वंकष आकलन तपासण्यासाठी आहेत. तिथे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ असे करून कसे चालेल! अशा परीक्षेसाठी  विषयाच्या ज्ञानासोबत कूटप्रश्न सोडवताना त्या ज्ञानाचा वापर (अॅप्लिकेशन) हाही भाग महत्त्वाचा आहे. सतत वाचनामुळे संकल्पनेचा वापर करणे शक्य सोपे होते.

विशेषतः अभ्यासक्रमातील प्रत्येक संकल्पनेशी मुले समरस न झाल्यामुळे एवढा महत्त्वाचा व सोपा विषय अवघड  वाटू शकतो. मुळात फिजिक्सचे अस्तित्व  तर आपल्या चालण्या-बोलण्यापासून वाहन, मोबाईल आणि टेलिव्हिजनपर्यंत व्यापलेले  आहे. चला तर असा सुंदर विषय मनोरंजक करूया !

अभ्यासाची प्राथमिक तयारी  
विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय शिकवताना प्रामुख्याने असे जाणवते की मुले संकल्पना आणि त्यावरील गणितीय उदाहरणे यांची सांगड घालताना कमी पडतात. त्यासाठी खालील बाबी तपासून पहा: संकल्पना वरवर समजावून न घेता सर्वकष आकलन, आकृत्यांचे आकलन व स्मरण, समीकरणांचे आकलन व स्मरण, समीकरणे सोडवताना मधल्या पायऱ्या (स्टेप) सुद्धा समजून घेणे, कारण त्यावरही काही उदाहरणे आधारित असतात. अकरावीतील काही  प्राथमिक महत्त्वाच्या बाबींचे वाचन.

फिजिक्स मधील उदाहरणे सोडवतानाचे टप्पे: सर्वप्रथम दिलेल्या व  शोधायच्या किमती (व्हॅल्यू) योग्य चिन्हाद्वारे (नोटेशन) नमूद करणे, नोटेशन समाविष्ट असलेले जे काही समीकरणे असतील ते ढोबळमानाने तपासून पहा व योग्य समीकरणाची निवड करा, काही वेळेस लागू असलेल्या समीकरणातील काही न दिलेल्या आवश्यक किमती  (व्हॅल्यू) आधी कुठल्या दुसऱ्या समीकरणाच्या मदतीने काढून घ्याव्या  लागतात. महत्वाचे म्हणजे तुम्ही सुरुवातीला पुस्तकात पाहून क्रमाक्रमाने उदाहरणे सोडवू शकता. परंतु एकदा उदाहरण समजल्यावर कुठलीही पायरी (स्टेप) न पाहता सोडवले तरच तुमची विचारशक्ती सक्रीय होईल. त्यामुळे परीक्षेत इतर क्लिष्ट उदाहरणे सोडवताना आपोआप मेंदूला चालना मिळेल, हे हमखास!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिजिक्स हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पदोपदी फिजिक्सचा उपयोग होतो. फिजिक्समधील सर्व संकल्पना या बहुतांशी उपकरणे व यंत्र बनवण्यासाठी वापरलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि तत्सम शाखेतील विद्यार्थी या संकल्पनांवर विविध उपक्रम (प्रोजेक्ट) लीलया मूर्त स्वरूपात आणतात आणि विविध व्यवसाय /इंडस्ट्रीमध्ये नोकरी पटकवतात. फिजिक्सने तर औषध, वैद्यकीय, रसायनिक शास्त्र हे सर्व क्षेत्रे प्रक्रिया, उपकरणे किंवा सिद्धांत या ना त्या मार्गाने व्यापलेले आहे. तेव्हा चला फिजिक्स मध्ये प्राविण्य मिळवायचा संकल्प करूया !

- डॉ. विजय सरदार (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com