

drip irrigation jharkhand subsidy
esakal
बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि वाढती पाणीटंचाई यामुळे शेतीसमोर सिंचनाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. पिकांच्या गरजेनुसार पाणी देण्यासोबतच खतांचा कार्यक्षम वापर, तणांचे नियंत्रण आणि मजुरीच्या खर्चात बचत असे अनेक फायदे या सूक्ष्म सिंचन पद्धतींमुळे मिळतात.
याशिवाय, सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी झारखंड शासनाकडून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे.