‘अर्थ’पूर्ण करिअरची नांदी

अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स हे पैशांविषयीचे, व्यवहारांविषयीचे आणि आर्थिक रचनेविषयीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन, वितरण, विपणन, वापर यांविषयीची माहिती अर्थशास्त्र देत असते. जगातील सर्व व्यवहारांचे रहाटगाडगे चलनातून चालू राहते.
‘अर्थ’पूर्ण करिअरची नांदी
‘अर्थ’पूर्ण करिअरची नांदीsakal
Updated on

करिअर अपडेट

प्रा. विजय नवले,करिअरतज्ज्ञ

अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स हे पैशांविषयीचे, व्यवहारांविषयीचे आणि आर्थिक रचनेविषयीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन, वितरण, विपणन, वापर यांविषयीची माहिती अर्थशास्त्र देत असते. जगातील सर्व व्यवहारांचे रहाटगाडगे चलनातून चालू राहते. अर्थशास्त्र देशाच्या सर्व कार्यक्षेत्रांशी संबंधित असते. ज्याला अर्थशास्त्र कळते तो व्यक्ती व्यावहारिकदृष्ट्या अधिक सक्षम असतो. त्यामुळेच यातील पदवीधर विविध कार्यक्षेत्रांमधील करिअरसाठी पात्र ठरतात.

पदवीबाबत

अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्टस् म्हणजेच बी.ए. इन इकॉनॉमिक्स ही पदवी घेता येते. पदवीचा कालावधी बारावीनंतर तीन वर्षांचा असतो, तर बी.ए. ऑनर्स हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. कला शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बी.ए. या पदवीसाठी पात्र असतो. अन्य शाखांचे म्हणजेच सायन्स/कॉमर्सचे विद्यार्थीदेखील बारावीनंतर बी.ए.साठी प्रवेश घेऊ शकतात. सर्वसामान्यपणे प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा नसते. राष्ट्रीय स्तरावरील काही विद्यापीठांसाठी ‘सीयूईटी’सारख्या काही मोजक्या प्रवेशपरीक्षा असतात.

अभ्यासक्रमाचे विषय

मायक्रो-इकॉनॉमिक्स, मॅक्रो-इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिकल मेथड्स ऑफ इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, फायनान्शिअल इकॉनॉमिक्स आदी विषय शिकविले जातात. थेअरी लेक्चर्सचा अधिक अंतर्भाव असतो. पाचव्या आणि सहाव्या सत्रात ऐच्छिक विषय असतात. सेमिस्टर पॅटर्नप्रमाणे विद्यापीठ स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. अभ्यासामध्ये संदर्भ ग्रंथांचा वापर अपेक्षित असतो. तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम यांद्वारे विद्यार्थी या विषयाशी समरस होतात. रीसर्च पेपरमधील योगदान, अंतिम टप्प्यातील प्रोजेक्ट वर्क यामुळे पदवीधर विद्यार्थी सक्षम ज्ञान ग्रहण करतात.

उच्च शिक्षणाच्या संधी

एमए इकॉनॉमिक्स, एमबीए फायनान्स, एमबीए (एचआर, मार्केटिंग, इंटरनॅशनल बिझनेस, इ.), एलएलबी यांसह उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असतात. एमबीए साठी सीईटी/कॅट, परदेशातील उच्च शिक्षणासाठी जीआरई/जीमॅट, वकिलीची सी.लॅट. तसेच विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा देता येतात.

कौशल्ये

शिक्षण कालावधीत विद्यार्थी या विषयाच्या अनुषंगाने विकसित होतो. जसे कि, सांख्यिकी (स्टॅटिस्टिकल) माहितीचा अन्वयार्थ काढणे, समस्यांचा अभ्यास आर्थिक मुद्द्यांवर करण्याची क्षमता निर्माण होणे, चार्ट्स, ग्राफ्स, मॉडेल्सचा वापर करून अर्थकारणातील माहिती सांगता येणे, क्लिष्ट आर्थिक आकडेवारी सहजपणे समजणे, अर्थकारणाचा संबंध सामाजिक समस्या, राजकीय गणिते, मानसशास्त्रीय भूमिका, राज्यशास्त्राच्या घडामोडी, ऐतिहासिक संदर्भ याआधारे समजावून घेता येणे, पैशाविषयीच्या गुंतागुंतीच्या चक्राचा आणि उलाढालीचा अभ्यास करता येणे.

कार्यक्षेत्रे

इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, नॅशनल सॅम्पल सर्व्हे, मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, प्लॅनिंग कमिशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स, लाइफ इन्शुरन्स कंपनी आदी सरकारी क्षेत्रे, त्याचसोबत मल्टिनॅशनल कंपनी, विविध बँका, कन्सल्टन्सी फर्म्स यांमध्ये दर्जेदार करिअरसाठी निवड होते.

भविष्यातील स्कोप

कायमस्वरूपी स्कोप असणाऱ्या करिअरमध्ये इकॉनॉमिक्स येते. फायनान्स, बँकिंग, मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, ट्रेडिंग, शेअर मार्केट अशी अनेक क्षेत्रे या विद्याशाखेशी संबंधित आहेत. व्यक्ती, कुटुंब, संस्था, आस्थापना, देश अशा सर्वच घटकांच्या विकासामध्ये इकॉनॉमिक्सचे ज्ञान उपयुक्त ठरते. अर्थकारणाचा थेट संबंध देशातील सर्वच क्षेत्रांशी असल्याने त्यातील तज्ज्ञांना करिअरचा स्कोप विस्तारित जाणारा आहे. संशोधक, विचारवंत, लेखक, व्याख्याते, धोरणकर्ते, व्यवस्थापक अशा अनेक मोठ्या व्यक्तींना अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा प्रभावी पाया यशाच्या शिखरावर नेऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.