

The Conflict Between Traditional Wisdom and Modern Science
Sakal
डॉ. मिलिंद नाईक (प्राचार्य, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला)
शिक्षण २.०
इतिहास सांगतो की योग्य शिक्षणामुळे महान व्यक्ती घडल्या, समाज संघटित झाले आणि राष्ट्रे उभी राहिली. शिक्षणाने माणसाला केवळ कुशल कामगार बनवले नाही, तर सजग नागरिक, संवेदनशील समाजघटक आणि राष्ट्रासाठी समर्पित व्यक्ती घडविल्या. परंतु शिक्षणाची सद्यःस्थिती काय दर्शवते? शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन मानण्याइतपत आपण आज संकुचित झालो आहोत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.