C.A : चार्टर्ड अकाऊंटंटसाठी प्रवेश परीक्षा

किमान बारावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
education Entrance Examination for Chartered Accountant
education Entrance Examination for Chartered Accountantsakal

- के. रवींद्र

कॉर्पोरेट कंपनी असो वा संस्था, वित्तीय लेखाजोखा, व्यवस्थापन व आर्थिक वर्षभराचा ताळेबंद व लेखा परीक्षणात ‘सीए’ मुख्य भूमिका बजावतो, ‘सीए’ला मराठीमध्ये सनदी लेखापाल असेही म्हणतात. ‘सीए’ कॉमर्स क्षेत्रातील सर्वोत्तम मनाची पदव्युत्तर पदवी सममूल्य मानली जाते आणि ही पदवी मिळविण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची (आयसीएआय) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

education Entrance Examination for Chartered Accountant
School Admission : पसंतीच्या शाळांसाठी पालकांची धावपळ; पाल्याच्या भविष्याची चिंता

चार्टर्ड अकाउंटंट कोर्ससाठी दोन मार्ग आहेत.

  • फाउंडेशन

  • डायरेक्ट एन्ट्री

फाउंडेशन कोर्स ः ‘सीए’ अभ्यासक्रमानुसार परीक्षा तीन वेगवेगळ्या स्तरांवर घेतली जाते.

  • फाउंडेशन

  • इंटरमिजिएट किंवा इंटर

  • फायनल

फाउंडेशन पात्रता

किमान बारावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थीही आयसीएआयच्या बोर्ड ऑफ स्टडिजमध्ये नोंदणी करू शकतो.

बोर्ड ऑफ स्टडिजमध्ये नोंदणी १ जानेवारी किंवा त्यापूर्वी नोंदणी केल्यावर मे किंवा जूनमध्ये परीक्षा देता येईल किंवा १ जुलै किंवा त्यापूर्वी नोंदणी केल्यावर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये परीक्षा देता येईल.

अभ्यासक्रम व पॅटर्न

एकूण ४०० गुणांची ३+२ तासांची ऑफलाइन परीक्षा ४ विषय पेपरमध्ये विभागलेली आहे.

पेपर १ आणि २ हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत, तर इतर २ व्यक्तिनिष्ठ आहेत.

प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० आणि एकूण ५० टक्के मिळविणे आवश्यक आहे.

पेपर ३ आणि ४ मधील चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नाला एकूण वाटप केलेल्या गुणांपैकी वजा केले जातील.

पेपर १ आणि २ साठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

education Entrance Examination for Chartered Accountant
Education : बारावीनंतर विद्यार्थ्यांना घेता येणार ‘बी.एड.’मध्ये थेट प्रवेश; डी. एड. कॉलेज यंदाही सुरूच राहणार

पेपर गुण

पेपर १ ः प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंग १००

पेपर २ ः बिझनेस लॉ अँड बिझनेस करस्पोन्डंस अँड रिपोर्टिंग १००

पेपर ३ ः बिझनेस मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग अँड स्टॅटिस्टिक्स १००

पेपर ४ ः बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस अँड कमर्शिअल नॉलेज १००

एकूण गुण ४००

education Entrance Examination for Chartered Accountant
Income Tax Returns : इन्कम टॅक्स भरण्यासाठी CA वर पैसे घालवू नका? केवळ या पाच गोष्टी करा!

इंटरमिजिएट

सीए इंटरमिजिएट प्रोग्रॅमसाठी उमेदवार दोन मार्गांनी नोंदणी करू शकतात. पहिला पर्याय सीए फाउंडेशन प्रोग्रॅमद्वारे आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे पदवी, पदव्युत्तर किंवा व्यावसायिक पदवी प्रोग्रॅमच्या विशिष्ट स्तरावर पात्र झाल्यानंतर थेट प्रवेश मार्ग.

पात्रता

पदवी/पदव्युत्तरसाठी ः

ज्या विद्यार्थ्यांनी कॉमन प्रोफिशियन्सी कोर्स किंवा सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते कोणत्याही सीए इंटरमिजिएट परीक्षा गटासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

सीए इंटरमिजिएट प्रोग्रॅम परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी ज्या महिन्यात परीक्षा होणार आहे, त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी आठ महिन्यांचा अभ्यास अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

डायरेक्ट एन्ट्री

वाणिज्य शाखेतून किमान ५५ टक्के गुणांसह पदवी आणि पदव्युत्तर पदवीधर असलेले उमेदवार सीए इंटरमिजिएट कोर्ससाठी थेट अर्ज करण्यास पात्र आहेत.

मात्र, वाणिज्य व्यतिरिक्त इतर शाखेतील उमेदवार किमान ६० टक्के आणि अधिक गुणांसह सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत.

सीएस आणि सीएमएचे विद्यार्थी

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सीएस एक्झिक्युटिव्ह स्तर उत्तीर्ण झालेले उमेदवार.

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट

ऑफ इंडिया द्वारे आयोजित CMA इंटरमिजिएट प्रोग्रॅम पूर्ण केलेले उमेदवार सीए

इंटर परीक्षेच्या गटांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

क्रमश:

महत्त्वाच्या लिंक :

१) https://www.icai.org

२) https://vidyarthimitra.org/news

(लेखक www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com