Admission: अकरावीसाठी शुक्रवारपासून निवडता येणार पसंतीचं महाविद्यालय

प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया होणार सुरू
education news 11th admission process next step of Choose preferred college for 11th from Friday pune
education news 11th admission process next step of Choose preferred college for 11th from Friday pune sakal
Updated on

पुणे : अकरावी प्रवेशासाठी पसंतीचे महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता.२२) पासून सूरू होणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. पुणे-पिंपरीचिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद शहरांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे होत आहे. दहावीचा निकाल लागून जवळपास महिना होऊन गेला तरी अकरावी प्रवेशासाठीचा दुसरा भाग कधी भरायचा या बद्दल विद्यार्थी संभ्रमात होते. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली नसल्याने प्रवेश प्रक्रियेला प्रचंड विलंब झाला होता. राज्य मंडळ वगळता इतर मंडळांच्या लांबलेल्या दहावीच्या निकालाचाही या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला होता. आता ही प्रतीक्षा संपली असून, येत्या शुक्रवारपासून विद्यार्थी पसंतीचे एक ते दहा महाविद्यालये निवडू शकतात. ज्या ग्रामिण भागात विद्यालय स्तरावर प्रवेश होतात. अशा कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे.

सीबीएससीच्या निकालानंतरच प्रवेश

शहरी भागात अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांमध्ये सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सीबीएससीच्या दहावीच्या निकालानंतरच प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरवात होणार आहे. तो पर्यंत, ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा पहिला भाग भरला आहे. अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांकासाठी भाग दोनही भरून ठेवावा. तसेच कोटाअंतर्गत प्रवेशासाठीही पसंतीच्या महाविद्यालयांना ऑनलाइन अर्ज करता येईल. सीबीएससीच्या निकालानंतरच प्रत्यक्ष प्रवेश फेरींना सुरवात होणार आहे. या काळात नवीन विद्यार्थ्यांनाही अर्जाचे भाग एक आणि दोन भरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com