नवनाथ दौंडकर यांना २९ व्या वर्षी मिळाली गणित विषयातील पीएच.डी.

करंजावणे येथील नवनाथ बाळासाहेब दौंडकर यांनी हलाखीच्या परीस्थितीवर मात करून वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी जिद्द, कष्ट, मेहनत व अभ्यासू वृत्तीच्या जोरावर गणित विषयातील डॉक्टरेट पदवी मिळविली
education news Navnath Daundkar got PhD in Mathematics at age of 29 pune
education news Navnath Daundkar got PhD in Mathematics at age of 29 punesakal
Updated on

तळेगाव ढमढेरे : करंजावणे (ता. शिरूर) येथील नवनाथ बाळासाहेब दौंडकर यांनी हलाखीच्या परीस्थितीवर मात करून वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी जिद्द, कष्ट, मेहनत व अभ्यासू वृत्तीच्या जोरावर गणित विषयातील डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. शिरूरचे माजी आमदार स्व. बाबुराव दौंडकर यांच्या गावातील नवनाथ दौंडकर यांनी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये गणितातील अल्जेब्रीक टोपोलॉजी या विषयात ४ प्रकारचे प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी (पीएच.डी.) मिळाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व एकता विद्यालय करंजावणे येथे १० वी पर्यंत शिक्षण झाले. बीएससी मॅथेमॅटिक्सचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झाले.

एमएस्सी मॅथेमॅटिक्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले. हे शिक्षण करताना त्यांनी नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. यावेळी त्यांनी भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना पुणे विद्यापीठामार्फत इराण येथे जागतिक मॅथेमॅटिकल ऑलंपियाड परिषदेमध्ये जगातील १९२ देशांमधून ४ था क्रमांक मिळविला. त्यानंतर त्यांनी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट (चेन्नई- तमिळनाडू ) याठिकाणी गणित विषयातील पीएचडी मिळविली. त्यांना गणित विषयातील अल्जेब्रिक टोपोलॉजी या विषयातील डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. नवनाथ दौंडकर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची होती. आई, वडील व बंधू प्रशांत दौंडकर यांनी उच्च शिक्षणासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. जिद्द, चिकाटी, मेहनत व गुरुजनांची शिकवण याच्या जोरावर यश मिळविल्याचे दौंडकर यांनी सांगितले. दरम्यान, नवनाथ दौंडकर यांना पीएचडी मिळाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com