education Savitribai Phule Pune University Final Semester Examination in June
education Savitribai Phule Pune University Final Semester Examination in Juneesakal

SPPU Exam : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा जूनमध्ये

परीक्षा व मुल्यमापन मंडळाकडून परीपत्रक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील उन्हाळी सत्राच्या परीक्षा जून २०२३ पासून पार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आले आहे. या संदर्भातील मार्गदर्शक तत्व आणि सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे विद्यापीठ स्तरावरील परीक्षा लांबल्या असून, उन्हाळी सत्रातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षा जून-जुलै मध्ये पार पडत आहे. नेहमीच्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. अंतर्गत मुल्यमापनासाठी महाविद्यालयांमध्ये आता प्रात्यक्षीक आणि तोंडी परीक्षा सुरू झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा या २ ते ३० मे या कालावधीत होतील तर जून महिन्यापासून लेखी परीक्षेला सुरुवात होईल. अभ्यासक्रमानुसार त्या त्या विषयांची वेळापत्रक विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदा शैक्षणिक वेळापत्रक पुर्ववत करण्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी शाखेतील पहिल्या वर्षाबरोबरच दुसरे वर्षाच्याही परीक्षा महाविद्यालय स्तरावर पार पडणार आहे. पदवीचे अंतीम आणि पदव्यूत्तर पदवीचे सर्व वर्षांची परीक्षा विद्यापीठ स्तरावरच पार पडणार आहे.

१५ जुलैच्या महाविद्यालय स्तरावरच ‘कॅप’

पारंपारिक विद्याशाखेतील पदवीचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका आणि मुल्यमापन महाविद्यालय स्तरावरच होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करणे, अंतर्गत आणि बहिस्त परीक्षक नेमने या बाबतचे अधिकार प्राचार्यांना असणार आहे. परीक्षांची यादी आणि वेळापत्रक महिनाभर आगोदर परीक्षा विभागाला कळविणे गरजेचे आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या बहुतेक सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्ज सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी नियोजित कालावधीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून परीक्षा वेळेत पार पडण्यास मदत होईल. यासंबंधी परीक्षा अधिकारी आणि प्राचार्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे.

- डॉ.महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com