सीबीएसईने केले प्रथम सत्राच्या परीक्षेत बदल; वाचा सविस्तर

प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार आता बहुपर्यायी प्रश्नपत्रिका
CBSE
CBSEsakal media

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आपल्याकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत (ssc and hsc exam) अनेक महत्वाचे बदल केले आहेत. आपल्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (multiple choice question papers) विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सुरूवातील सीबीएसईने 16 आणि 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्राची परीक्षेत पहिल्यांदाच बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा घेण्याचा (exam) निर्णय घेतला आहे.

CBSE
आरोग्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; भातखळकर यांची मागणी

या परीक्षेत विद्यार्थ्यांना ओएमआर शीट (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) दिली जाणार आहे. या शीटमध्ये प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर शीट समजण्यासाठी देशातील प्रत्येक शाळांनी अगोदर आपला सराव घ्यावा असे आदेश आपल्या शाळांना दिले आहेत. दहावी, बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ओएमआर बद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे ओएमआर शीट नीट समजावी, यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सराव सत्र आयोजित केली जाणार आहेत. कोरोनामुळे सीबीएसईच्या परीक्षा यंदा दोन टप्प्यात होणार आहेत. प्रथम सत्राची परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांची असेल तर टर्म 2 ची परीक्षा थिमॅटीक पद्धतीने होईल. दोन्ही परीक्षांसाठी 50-50 टक्के अभ्यासक्रम असणार आहेत.

नवीन बदलानुसार परीक्षेसंदर्भात महत्वाचे मुद्दे

- ओएमआर शीटवर दिलेल्या जागेत वरच्या उजव्या कोपर्‍यात प्रश्नपत्रिकेचा कोड लिहायचा आहे.

- विद्यार्थ्यांचा तपशील ओएमआरमध्ये भरला जाईल.

- वर दिलेले सर्व तपशील बरोबर आहेत असे लिहून ओएमआरवर विद्यार्थ्याने सही करायची आहे.

- फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेनचा वापर करावा.

- पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे. पेन्सिलचा वापर केल्याचे आढळल्यास तो गैरप्रकार मानून विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com