- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
Remember not only to say the right thing in the right place, but far more difficult, to leave unsaid the wrong things at the tempting place.
- Benjamin Franklin
सेट इन ऑर्डर - वेचून, वेगवेगळे करून, निवडून ठेवलेल्या, सवयींचे. मानसिकतेचे, स्वभावविशेषांचे वर्गीकरण करून आणि त्यांची वेगवेगळ्या, हव्या-नको त्या कप्प्यांमध्ये वासलात लावण्यासाठी किंवा जिथे शक्य आहे तिथे उपयोगात आणण्यासाठी व्यवस्थित ठेऊन देणे.
सेट इन ऑर्डर म्हणजे नीटनेटकेपणाने व्यवस्थापन करणे. तुंबलेले पाणी मोकळे होणे, अस्वच्छता दूर होणे, दाटलेले मळभ दूर होणे.
मनात वेड्या विचारांचा पसारा झालाय तो किती आणि कुठे-कुठे झालाय? हे या सर्व कृतींमुळे लक्षात येते.
‘मग छान, पवित्र विचारही आपल्या मनात येत असतील ना? असे अनेक स्वसाक्षात्कार होत असतील ना?’ राजूला प्रश्न पडलाच.
आपण स्वतःच स्वतःला किंवा इतर मला समजतात तितके, बावळट, मूर्ख, नाहीत. शेळपट, तापट, हिंसक, दुष्ट, कारस्थानी, भेकड, कुरूप, रंगाने काळे, बुटके, म्हणून न्यूनगंड बाळगणारे तुसडे असे ठसे स्वतःवरच लावलेले नाहीतच, याची खात्री पटते.
‘हां मग आपले स्वतःबद्दल आणि इतरांचे आपल्याबद्दल ठरवलेले विचार, अगदी तसेच आपण नाहीत हे कळाल्याने हायसे वाटत असेल ना?’ राजूने सुस्कारा सोडला.
‘अगदी योग्य बोललास. त्यामुळे होते काय तर, योग्य-अयोग्य, सुंदर-कुरूप, हुशार-मठ्ठ, सकारात्मक-नकारात्मक, विवेकी-अविवेकी, उमदे-कद्रू, रसिक-अरसिक असे आपण आपल्या स्वभावाचे कप्पे जे केलेले असतात ना, ते टाळतो. कोणताही विवेक न बाळगता, कोणत्याही कप्प्यात आपण आपल्याला टाकून दिलेले असते ना, किंवा अक्षरशः ढकलून दिलेले असते ना, ते टाळायला शिकतो.
विचारांच्या गर्तेत किंवा समज-अपसमजाच्या राडारोड्यात आपण गुंतून जाणे टाळतो.
‘सेट इन ऑर्डर’ या प्रक्रियेत हाच गोंधळ आपल्याला निस्तरायचा असतो. किंवा जी वैचारिक बजबजपुरी आसपास माजलेली असते, ती व्यवस्थित करायची असते.
आत्मविश्वास नसेल, न्यूनगंड किंवा अहंगंड असेल, संभाषण कौशल्य छान असेल, असा स्वशोध घेऊन योग्य त्या कप्प्यात स्वतःला फिट करायचे. त्यातही लवचिकता ठेवायची.
थोडक्यात कप्पे कोण कोणते आहेत ते पक्के करायचे आणि मी स्वतःला नेमक्या कोणत्या कप्प्यात फीट केले आहे, हे ठरवणे म्हणजे ‘सेट इन ऑर्डर!’
‘हा राजू, म्हणजे मी पूर्ण नालायक आहे, असे न समजता, माझी लायकी कशात आहे, ते ठरवणे आणि तसे स्पष्टपणे स्वतःशी ठसवणे, म्हणजेच खुंटा हलवून बळकट करणे. असेच ना?’ राजूने विचारले.
‘अगदी बरोबर, ही प्रक्रिया, ‘शाईन’ या तिसऱ्या प्रकारात घडते. ती कशी करायची ते आता पाहूया.’ असे म्हणत मी राजूला जरा धीर दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.