

AI voice generators are making content creation faster, more natural, and accessible across multiple languages.
Sakal
सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
कल्पना करा, तुम्ही काही ओळी लिहिल्या आणि संगणकाने त्या अगदी मानवासारख्या आवाजात वाचून दाखवल्या. इतकेच नव्हे तर तो आवाज तुमच्यासारखाही असू शकतो! काही वर्षांपूर्वी ही गोष्ट विज्ञानकथेतील कल्पना वाटली असती. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेतील झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे आज हे वास्तव झाले आहे. या क्षेत्रात जगभरात विशेष चर्चेत असलेले नाव म्हणजे इलेव्हनलॅब्स. हे साधन मजकुराचे नैसर्गिक आवाजात रूपांतर करते, विविध भाषांमध्ये बोलू शकते आणि अगदी एखाद्या व्यक्तीचा आवाजही तयार करू शकते. त्यामुळे ऑडिओ निर्मितीच्या जगात एक नवे पर्व सुरू झाले आहे.