
मुंबई : अकरावी ऑनलाईनच्या (Eleventh online admission) तीन प्रवेश फेऱ्यानंतर शिक्षण विभागाने (education system) विशेष फेरीचे आयोजन केले, त्याची आज अर्ज भरण्याची प्रक्रिया (Application process) पूर्ण झाली. मात्र त्यासाठीचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्याने अकरावीच्या प्रवेशात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर प्रवेशाला (illegal admission) वाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगरक्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाई प्रवेशासाठी तीन प्रवेश फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहिल्याने त्यासाठी विशेष फेरी मुंबई महानगरक्षेत्रात सुरू करण्यात आली होती. त्यासाठी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. मात्र याच दरम्यान, या प्रवेशाच्या जागा भरेपर्यंत अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू राहिल, असे शिक्षण विभागाने जाहीर केल्याने या प्रवेशात मोठ्या प्रमाणात अनागोंदी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या फेरीनंतर मोठ्याप्रमाणात कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागा ऑनलाईन प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर प्रवेश होत असल्याचा दावा विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.
"अकरावीतील सर्व प्रवेश हे गुणवत्तेच्या आधारावर केले जावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना त्या आदेशाला केराची टोपली दाखवत अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरीच्या नावाखाली ऑफलाईन प्रवेश दिले जात असल्याने यातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत असून या सर्व प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली जावी."
- अनिल वाणी, अध्यक्ष, बहुजन विद्यार्थी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.