
इलॉन मस्क यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपनी xAI सध्या मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सपासून डेटा सायंटिस्ट, कायदेशीर तज्ज्ञांपासून प्रॉडक्ट डिझायनर्सपर्यंत विविध भूमिकांसाठी ही कंपनी आपला विस्तार करत आहे. पालो अल्टो, सॅन फ्रान्सिस्को आणि मेम्फिस येथील कार्यालयांमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत, तसेच काही भूमिकांसाठी रिमोट कामाची संधीही आहे.