

Mental Health
esakal
आपल्या भावनांवर ताबा असणं मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. दिवसभरातील घटनांमुळे आपले मूड्ससारखे बदलत जातात? अनुकूल, प्रतिकूल घटनांचा परिणाम आपल्यावर होतो. तो खोलवर आणि दीर्घकाळ इतका राहतो का की आपली स्वस्थता हरवून जाते? असं होत असल्यास आपला भावनांवर ताबा नाहीय आणि तो मिळवायला हवा. आपल्या भावनांचे, विशेषतः नकारात्मक भावनांचे मालक असावं. हे शक्य आहे का? याचं उत्तर होकारार्थी आहे.
भावनिकदृष्ट्या समतोल मिळवणं म्हणजे केवळ ताणतणावांवर मात करणं नव्हे. तर स्वत:चे विचार, भावना आणि वर्तन याविषयी जागरूक असणं होय. म्हणूनच आपण म्हणतो की एखादी व्यक्ती भावनिकदृष्ट्या सशक्त, सक्षम, स्थिर आहे, तेव्हा पुढील गोष्टी करण्याची क्षमता तिच्या मेंटल मेकअपमध्ये असतात.