इंजिनिअरिंग हा विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक पसंतीस उतरलेला करिअरचा पर्याय आहे. निकाल लागल्यावर सर्वांत मोठा प्रश्न उभा राहतो, कोणती ब्रँच (शाखा) घ्यावी आणि कोणते महाविद्यालय निवडावे? काही विद्यार्थी चांगली ब्रँच मिळवतात परंतु महाविद्यालय फारसे नावाजलेले नसते, तर काहींना उत्तम महाविद्यालय मिळते परंतु हवी ती ब्रँच मिळत नाही. अशा वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.