Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

Check Your Allotment Now: १.५७ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत संधी! १६,६१५ विद्यार्थ्यांचा प्रवेश 'ऑटो फ्रिज'; ३ ते ५ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक...वाचा पुढील प्रक्रिया..
Engineering CAP Round 1 seat allotment result

Engineering CAP Round 1 seat allotment result and next steps

esakal 

Updated on

Engineering CAP Round 1 Result: राज्यातील अभियांत्रिकी (Engineering) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या केंद्रीय प्रवेश फेरीची (CAP Round 1) allotment यादी रविवारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) जाहीर करण्यात आली आहे. पसंतीक्रम भरलेल्या २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालयांचे वाटप झाले आहे.

विशेष म्हणजे, १६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे (First Preference) महाविद्यालय मिळाल्याने त्यांचा प्रवेश ‘ऑटो फ्रिज’ झाला आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात ३ ते ५ ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. हा प्रवेश नाकारल्यास त्यांना पुढील तीन कॅप फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.

खालील लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता-

https://fe2026.mahacet.org/StaticPages/frmCheckAllotmentStatusCAPRound1

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com