आगमी सत्रापासून इंजिनिअरींगचे शिक्षण १२ भारतीय भाषांमध्ये मिळणार

1500 शिक्षकांना विद्यार्थ्यांना 12 भारतीय भाषांमध्ये शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
education
education Esakal

नवी दिल्ली : आगामी शैक्षणिक सत्र 2022-23 पासून 18 राज्यांमधील अभियांत्रिकी (Engineering Collage )महाविद्यालयातील बीटेक द्वितीय वर्षाचे विद्यार्थी इंग्रजी व्यतिरिक्त हिंदीसह 12 भारतीय भाषांमध्ये (Indian Languages) शिक्षण घेऊ शकणार आहेत. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी द्वितीय वर्षातील विद्यार्थांसाठी (NEP) B.Tech साठी हिंदी, मराठी, बंगली, तमिळ, तेलगू, गुजराती, कन्नड, पंजाबी, ओरिया, आसामी, उर्दू आणि मल्याळम भाषांमध्ये पुस्तके तयार केली आहेत. (Engineering Education In Indian Languages )

education
अभियांत्रिकी शिक्षण घेऊन दूध व्यवसाय अन्‌ सेंद्रिय शेतीतून मिळविले उत्पन्न

AICTE च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आठ भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेण्याची संधी देण्यात आली होती. ज्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, आगामी शैक्षणिक सत्र 2022-23 साठी, आता विद्यार्थी 12 भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेऊ शकणार आहेत. 1500 शिक्षकांना अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या 12 भारतीय भाषांमध्ये शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

education
केकेच्या निधनानंतर TMC विद्यार्थी संघटनेने केला मोठा खुलासा,म्हणाले..

19 संस्थांमध्ये सात विषयांवर अभ्यास

एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, विविध राज्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 19 संस्थांमध्ये बीटेक प्रोग्राममध्ये पहिल्या वर्षी या भारतीय भाषांमध्ये सात विषय शिकवले जात आहेत. यामध्ये २५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी या भारतीय भाषांमध्ये B.Tech करण्यासाठी प्रवेश घेतला आहे. याशिवाय आयटीआयमध्येही भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी पदविका कार्यक्रम घेण्याची योजना आहे.

या अंतर्गत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा स्तरावर 12 पुस्तके आणि पदवी स्तरावर 10 पुस्तके नऊ भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली आहेत. या नऊ भारतीय भाषांव्यतिरिक्त, AICTE ने आसामी, उर्दू आणि मल्याळम या आणखी तीन भारतीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू केले आहे. एकूण 291 लेखक, अनुवादक, पडताळणी करणारे आणि भाषा तज्ज्ञांनी गेल्या एक वर्षाच्या कालावधीत प्रथम वर्षाच्या पुस्तकांशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

500 महाविद्यालये कव्हर करण्याची योजना

AICTE शैक्षणिक सत्र 2023-24 पर्यंत 500 महाविद्यालयांमध्ये भारतीय भाषांमध्ये BTech सुरू करण्याची योजना आखली आहे. यासाठी बी.टेक तृतीय वर्षाच्या पुस्तकांचे 15 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय 500 तांत्रिक महाविद्यालयांच्या माध्यमातून सुमारे 30 हजार विद्यार्थी जोडण्याची तयारी यासाठी सुरू आहे. याशिवाय बीटेक प्लॅटफॉर्मवरच डिजिटल माध्यमातून द्वितीय आणि तृतीय वर्षाचे सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com