ESIC Jobs
ESIC Jobs

"ईएसआयसी'मध्ये साडेसहा हजार पदांसाठी होणार भरती ! बारावी व पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी 

सोलापूर : जर आपण बारावी पास किंवा पदवीधर असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळा (ईएसआयसी) तर्फे विविध पदांची भरती करण्यात येत आहे. आपण जर बारावी व पदवी शिक्षण पूर्ण केलेले असाल, तर जाणून घ्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती... 

कर्मचारी राज्य विमा महामंडळा (ईएसआयसी) तर्फे विविध पदांची भरती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत अप्पर डिव्हिजन क्‍लर्क, अप्पर डिव्हिजन क्‍लर्क कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत एकूण 6552 पदे भरती करण्यात येणार आहेत. त्यापैकी अप्पर डिव्हिजन क्‍लर्क, अप्पर डिव्हिजन क्‍लर्क कॅशिअरच्या 6306 आणि स्टेनोग्राफरच्या 246 जागांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. 

अर्जाची प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे आणि 31 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत त्यांनी ईएसआयसीच्या अधिकृत पोर्टलवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की अर्जात काही दोष आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल. 

ईएसआयसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावेत. अप्पर डिव्हिजन क्‍लर्क / अप्पर डिव्हिजन क्‍लर्क कॅशिअर या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेतलेली असावी. यासह उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगणकीय ज्ञान घेतलेले असावेत. त्याचबरोबर उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. यासह शासकीय निकषानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असेल. 

अशी चालेले निवड प्रक्रिया 
अप्पर डिव्हिजन क्‍लर्क / अप्पर डिव्हिजन क्‍लर्क कॅशिअर पदाची निवड लेखी परीक्षा व छाननीसह फिटनेस परीक्षेच्या आधारे केली जाईल. तसेच मुलाखतीच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. याशिवाय भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com