

Eligibility Criteria for EXIM Bank Management Trainee Posts
esakal
EXIM Bank Management Trainee Recruitment 2026: एक्सपोर्ट- इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM बँक)ने २०२६ मध्ये तरुणांसाठी पहिली मोठी भरती जाहीर केली आहे. बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी (बँकिंग ऑपरेशन्स) पदांसाठी अधिकृत अधिसूचना १७ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण ४० पदे भरली जातील. बँकिंग क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.