
रोहन मगदूम - वरिष्ठ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट तज्ज्ञ
तुम्ही कधी विचार केला आहे का, एका जागेवर बसून आपण जगाचा अनुभव घेऊ शकतो? मेटाव्हर्स म्हणजे याच कल्पनेचं प्रत्यक्षात उतरणं. हा डिजिटल जगाचा नवीन अध्याय आहे, जिथे तुम्ही केवळ इंटरनेटवर माहिती वाचणार नाही, तर त्या आभासी जगाचा प्रत्यक्ष भाग बनाल.
मेटाव्हर्स म्हणजे काय?
सरळ शब्दांत सांगायचं झालं, तर मेटाव्हर्स हे एक आभासी विश्व आहे. जिथे तुम्ही स्वतःचा थ्रीडी अवतार तयार करून फिरू शकता, काम करू शकता, शिकू शकता, मित्रांशी गप्पा मारू शकता आणि खरेदीही करू शकता. या जगात वास्तव आणि तंत्रज्ञान एकत्र येतं. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या घरात बसून आभासी मॉलमध्ये फिरू शकता किंवा मेटाव्हर्सच्या माध्यमातून एखाद्या परदेशी मैफलीत सहभागी होऊ शकता.