स्वतःला तपासताना

एखादा कारखाना उभारताना त्या प्रकल्पाचे व्यवस्थित मूल्यांकन, परिपूर्ण अभ्यास करावा लागतो.
swot
swotsakal
Updated on

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

E duccation is not the learning of the facts, but the training of the mind to think.

- Albert Einstein.

सर्व मानसिक तयारी करून राजू परत येत विचारत झाला.

याचा अर्थ असा की, ‘५एस’साठी माईंडफुलनेस, ध्यानधारणा, एकाग्रता, हॅप्पीनेस, माईंड जीम वगैरे पद्धतींबद्दल निदान एकेकदा तरी तज्ज्ञ व्यक्तींकडून समजावून, शिकून घ्याव्यात असे माझे म्हणणे असेल. बरोबर ना? ‘५एस’ ही पद्धत स्वतःसाठी वापरणे, हे स्वयं मूल्यांकन होऊ शकते. ते कसे करता येईल?

असेच तुला विचारायचे आहे ना?’ मी विचारले.

एखादा कारखाना उभारताना त्या प्रकल्पाचे व्यवस्थित मूल्यांकन, परिपूर्ण अभ्यास करावा लागतो. तसेच शरीर व्यवस्थित, सुरळीत चालावे म्हणून शरीराचे अधिपती, जे मन आहे, त्याचा अभ्यास आणि चलनवलनाची पद्धती ठरवावी लागते त्यासाठी स्वतःचेच मन तपासावे, अभ्यासावे लागते.

यासाठी उद्योग उभारणीसाठी उपयुक्त ठरलेली; SWOC, ANALYSIS ही पद्धत मन उभारणीसाठीही लागू पडू शकते. हे स्वयंमूल्याकन आधी केले तर, मन चंगा करण्यासाठी ‘५एस’ पद्धत लगेच आत्मसात करता येईल.

स्वॉक ॲनालिसिस

हा स्वॉक चार इंग्लिश शब्दांच्या अद्याक्षरांचा समूह आहे.

Strength (बलस्थाने), Weakness (कमतरता), Opportunity (संधी), Challenges (आव्हाने) काही वर्षांपूर्वी ‘C’च्या ऐवजी ‘T’ म्हणजेच Threat (अडथळे) हा शब्द वापरला जायचा, त्याला जरा नकारात्मकतेचा वास येतो. म्हणून आव्हानांसाठी ‘C’ हे अद्याक्षर हल्ली वापरले जाते.

तुमच्यातील बलस्थाने, ज्या कारणे तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता आणि ज्यामुळे तुम्हाला विविध संधी उपलब्ध

होऊ शकतात, अनेक मार्गांचे दारे, खिडक्या तुम्हाला सताड उघडू शकतात, तर तुमच्यातील कमतरता तुमच्यासमोर आव्हाने म्हणून उभ्या ठाकू शकतात. म्हणून ‘सॉर्ट किंवा सेट इन ऑर्डर’ या दुसऱ्या ‘एस’साठी जे करायचे आहे, ते हे ‘स्वॉक ॲनालिसिस’ स्वयं मूल्यनिर्धारण, स्वयंविकासासाठी असे स्वतःचे तपासणे महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरू शकते. स्वतःच्या करिअरबद्दल स्वच्छ दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो.

‘अच्छा म्हणजे, मला काय वाटते ना, ते मी ऐकवतो,’ असे म्हणत राजूने पुढील पंक्ती माझ्या कानावर फेकल्या.

निक सत्त्व ते निवडावे,

व्यर्थ वाया ते उडवावे.

मनुष्य जन्म मार्गी तो लावावा,

आयुष्य सत्य ते जिवी धरावे!

व्वा, छानच. त्यासाठी विशिष्ट क्रमाने पुढे पुढे जावे लागेल मग ती कार्यपद्धती तो क्रम समजून घेण्यासाठी राजू माझ्यासमोर अगदी शिष्योत्तम सारखा बसला. म्हणजे मला जी त्याची बैठक आणि तयार मनोवस्था जशी हवी, तसाच तो आपसूक झाली. फार काही त्याला वेगळे सांगावे लागले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com