esakal | महाविद्यालयांच्या शुल्क निश्चितीच्या प्रस्तावांना मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

college fees

महाविद्यालयांच्या शुल्क निश्चितीच्या प्रस्तावांना मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अतिवृष्टी आणि लेखापरिक्षण अहवालासंबंधीच्या अडचणींमुळे शुल्क निश्चितीच्या प्रस्तावांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाविद्यालयांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शुल्क निश्चितीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी गुरुवार (ता.१४) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण शुल्क समितीचे सहसंचालक हरिविजय शिंदे यांनी यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या शुल्क निश्चितीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ज्यामध्ये शुल्कनिश्चितीच्या भाग ‘अ’साठी ३० सप्टेंबर आणि भाग ‘ब’साठी शुक्रवार (ता.८) पर्यंतची वेळ देण्यात आली होती. परंतु, महाविद्यालयांना लेखापरीक्षण अहवाल प्राप्त होण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ही मुदतवाढ देण्यात आल्याचे शिंदे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

loading image
go to top