Jobs : FACT करणार पदवीधर व टेक्‍निशियन अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

job vacancies
FACT करणार पदवीधर व टेक्‍निशियन अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

'FACT' करणार पदवीधर व टेक्‍निशियन अप्रेंटिस पदांची भरती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : Fertilizers and Chemicals Travancore Limited (FACT) ने पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांच्या भरतीसाठी (Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. FACT च्या या भरतीसाठी (Jobs) अर्ज करणारे उमेदवार कंपनीच्या fact.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. FACT च्या या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये एकूण 81 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2021 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरती सूचना वाचून घ्यावी.

हेही वाचा: इतर बोर्डाच्या 9वी ते 12वी विद्यार्थ्यांनाही मिळणार CBSE प्रवेश

रिक्त जागांचा तपशील...

  • पदवीधर शिकाऊ : 24 पदे

  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ : 57 पदे

जाणून घ्या पात्रता

पदवीधर शिकाऊ उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्‍यक आहे. तर टेक्‍निशियनसाठी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा असणे आवश्‍यक आहे.

उमेदवारांची निवड त्यांच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. संबंधित विषयासाठी 50 टक्के गुण दिले जातील आणि पदवी किंवा दहावीला 50 टक्के गुण दिले जातील.

हेही वाचा: 'येथे' निघाली 1000 लॅब टेक्‍निशियनची भरती! जाणून घ्या सविस्तर

येथे जाणून घ्या अधिसूचना : https://fact.co.in//images/upload/Dip-&-Gra-Adv-Eng-2022_906.pdf

भरती अधिसूचनेनुसार, बीओएटी साउदर्न रिजनमध्ये नोंदणीकृत केरळमधील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2021 आहे.

loading image
go to top