धारवाड येथील प्रशांत पीयूसी आणि दहावीच्या बनावट गुणपत्रिका देत होता. त्याला त्याच्या मोबाईल फोनसह अटक केली. ३०० हून अधिक बनावट गुणपत्रिका असल्याचे आढळून आले.
बंगळूर : कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या (Karnataka State Board of Secondary and Higher Education) नावाने दहावी आणि बारावीच्या बनावट गुणपत्रिका (Fake Marksheet of 10th and 12th Standard) विकून फसवणूक करणारे जाळे उघड करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत गुडुमी ऊर्फ प्रशांत (वय ४१, रा. चैतन्यनगर, धारवाड, मोनीष (३६, रा. श्रीनिवासनगर, बनशंकरी) आणि राजशेखर बळ्ळारी (४१, रा. लक्ष्मेश्वर, गदग) अशी त्यांची नावे आहेत. प्रशांत आणि मोनीष हे एमबीए पदव्युत्तर आहेत.