
डी. एस. कुलकर्णी - जीवन कौशल्य प्रशिक्षक
हम भी दरिया हैं, हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ़ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा।
- बशीर बद्र
आत्तापर्यंतच्या लेखांत स्वतःचा शोध घ्या, स्वधर्म तपासा यावर भर दिला आहे. स्वधर्म म्हणजे स्ववृत्ती, दृष्टिकोन, स्वआवड. माझी एक भाची आहे, सई. ती दहावी, बारावी इतरांसारखीच उत्तीर्ण झाली. या प्रवासात फिजिक्स ऑलिंपियाड वगैरे स्पर्धांचा प्रयत्न सुरू केला आणि अचानक तिला लक्षात आले, ‘अरेच्या, आपली दमछाक होते आहे, आपल्याला हे सर्व जसेच्या तसे आवडत नाहीए. मला काहीतरी वेगळे करायला हवे. मग काय? मी आत्तापर्यंत जलद गोलंदाजी करतेय. मला कदाचित फिरकी गोलंदाजी करायला हवी. एव्हढा मोठ्या रन-अपची गरज नाही. धावगती कमी करूनही प्रभावी गोलंदाजी म्हणजेच करिअर कसे करावे?’