

How To Stay Happy During Exams: सध्या परीक्षेचा हंगाम आहे. अभ्यासाचे वारे जोरदार वाहत आहेतच. त्याचबरोबर काही परीक्षार्थी इतर प्रयत्नही करताना दिसतात. देवापासून परीक्षकापर्यंत सर्वांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न होतात. हे करताना स्वतः मात्र अप्रसन्न (अस्वस्थ) असतात. खरे म्हणजे आपले मन प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न केले तर इतर कोणाची पायरी चढण्याची गरजच नाही. सुयशाच्या जिन्याची हीच पहिली पायरी होय.