UGC : परदेशी विद्यापीठांबाबत UGC चा मोठा निर्णय; अधिसूचना जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UGC

UGC : परदेशी विद्यापीठांबाबत UGC चा मोठा निर्णय; अधिसूचना जारी

UGC on foreign universities setting up campuses in India :  परदेशी विद्यापीठांसाठी युजीसीने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

भारतात शाखा उघडणाऱ्या परदेशी विद्यापीठांना ऑनलाइन वर्ग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख एम जगदेश कुमार यांनी दिली आहे.

मात्र, भारतात कॅम्पस उभारणाऱ्या परदेशी विद्यापीठांना त्यांची स्वतःची प्रवेश प्रक्रिया आखण्याचे स्वातंत्र्य असेल असे जगदेश कुमार यांनी स्पष्ट केले. भारतात कॅम्पस सुरू करणाऱ्या परदेशी विद्यापीठांना केवळ फिजिकल मोडमध्ये पूर्णवेळ प्रोग्रॅम घेऊ शकतात मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण देऊ शकत नाहीत.

एम जगदेश कुमार म्हणाले की, परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मंजुरीची आवश्यकता असेल. प्रारंभिक मान्यता 10 वर्षांसाठी असेल. 

हेही वाचा: Air India : लघुशंका करणाऱ्याला ३० दिवसांची शिक्षा तर, अर्णबशी वाद घालणाऱ्याला...; TMC चा हल्लाबोल

देशात कॅम्पस असलेली परदेशी विद्यापीठे केवळ फिजिकल मोडमध्ये पूर्णवेळ कार्यक्रमांचे आयोजन करू शकते. मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण देऊ शकत नाहीत. या विद्यापीठांना त्यांची स्वतःची प्रवेश प्रक्रिया आणि फी संरचना तयार करण्याचे स्वातंत्र्य असेल, असे एम जगदेश कुमार म्हणाले. शेअरहोल्डर्सकडून अभिप्राय घेतल्यानंतर महिना अखेरीस अंतिम नियम अधिसूचित केले जातील असे ते म्हणाले.