GATE 2023 | 'गेट' परीक्षेचे हॉल तिकीट आता या तारखेला मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GATE 2023

GATE 2023 : 'गेट' परीक्षेचे हॉल तिकीट आता या तारखेला मिळणार

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूरने अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE 2023) साठी प्रवेशपत्रांचे प्रकाशन पुढे ढकलले आहे. उमेदवार ९ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट gate.iitk.ac.in वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील.

“काही तांत्रिक कारणांमुळे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास उशीर झाला आहे आणि आता ते ९ जानेवारी २०२३ रोजी उपलब्ध केले जाईल,” अशी सूचना देण्यात आली आहे.

गेट २०२३ ही परीक्षा ४, ५, ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी आयआयटी कानपूरद्वारे आयोजित केली जाणार आहे. १६ मार्चला निकाल लागणार आहे.

असे डाऊनलोड करा GATE 2023चे प्रवेशपत्र :

gate.iitk.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

GATE 2023 प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.

तुमचे लॉग इन तपशील लिहा आणि सबमिट करा.

प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.

भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

GATE बद्दल

अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) ही एक राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा आहे जी प्रामुख्याने अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/आर्किटेक्चर/विज्ञान/वाणिज्य/कला मधील विविध पदवीपूर्व विषयांच्या सर्वसमावेशक आकलनाची चाचणी करते. GATE 2023 ही संगणक-आधारित चाचणी (CBT) असेल जी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेद्वारे आयोजित केली जात आहे.

टॅग्स :EngineeringEntrance Exam